मुंबई, 23 जून : 90च्या दशकात टेलिव्हिजनवर आलेला सीआयडी हा क्राइम सॉल्विंग शो सगळ्यांनी पाहिला आहे. आजही सीआयडीचे एपिसोड प्रेक्षक आवडीने पाहतात. ACP प्रद्युम्न आणि त्यांची कमाल टीम प्रत्येक एपिसोड खास करायचे. अपहरणापासून असो किंवा हत्या प्रत्येक केस ते ज्या प्रकारे हाताळताना दिसायचे ते पाहून टीव्हीसमोर बसलेला प्रेक्षक तिथून उठायचा नाही. CIDमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना आजही त्यांच्या भुमिकेमुळे ओळखलं जातंय. त्यातील काही कलाकारांनी पुढे अनेक सिनेमात काम केली. इतर क्राइम शो होस्ट केले. तर काहींनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. CIDमधील प्रत्येक पात्र भन्नाट होतं. त्यातील गोरा गोरा घाऱ्या डोळ्यांचा इन्स्पेक्टर विवेक तुम्हाला आठवत असेल. CID नंतर विवेक फार कुठे दिसला नाही. तो सध्या काय करतो पाहूया. CIDची संपूर्ण स्टारकास्टच जबरदस्त होती. ज्यात दया आणि अभिजीत सारखे बॉडीगार्ड ऑफिसर्स कॉमेडी साइडकिक फ्रेडी आणि विवेक सारखा तरूण अधिकारी. हे सगळे नेहमीच गुन्हेगारांना पकडण्यासाठी निडर स्टन्ट करायचे. काळानुसार CIDच्या टीममध्ये अनेक बदल झाले. अनेक नवीन लोक आले. त्यात इन्स्पेक्टर विवेक खूप काळ मालिकेत होता. एकेदिवशी विवेकनं अचानक मालिकेतून एक्झिट घेतली. हेही वाचा - रसोडो में कौन था फेम राशि बेन आता आहे तरी कुठे? रॅप साँगमुळे झालेली खूप चर्चा
Thank you so much for your kindness, love, and appreciation for whatever little I have done. It means a lot to me and it is deeply appreciated! Infinite gratitude and love, always.👍🙏🙏🙏☀️⭐️💛 https://t.co/TjD0UJVR9B
— Viivek Mashru (@ViivekMashru) June 21, 2023
इन्स्पेक्टर विवेकने CID सोडल्यानंतर अभिनयातूनही ब्रेक घेतला. अभिनय सोडून त्याने त्याचं नवं करिअर सुरू केलं. इन्स्पेक्टर विवेक सध्या बंगळूरू येथील CMR विश्वविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करतोय. तिथे तो कॉमन कोर करिक्युलम विभागाचं डायरेक्टर पद देण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर एका युझरनं ट्विट करत विवेकचा एक जुना फोटो शेअर केला आहे. तुम्ही यांना ओळखत असाल तर तुमचं बालपण नक्कीच शानदार गेलं असणार. या ट्विटवर एका युझरनं रिप्लाय देत, हे आता कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याचं सांगितलं. हे ट्विट अल्पावधीत चांगलंच व्हायरल झालं. स्वत: अभिनेता विवेकनं हे ट्विट शेअर करत आभार मानले. त्याने म्हटलं, मी जे काही छोटं काम केलं होतं त्यासाठी मला तुम्ही जे काही प्रेम दिलं आहे त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे.