मुंबई 16 जुलै**:** चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी देशभरातील शेकडो तरुण कलाकार दररोज मुंबईत येतात. या ठिकाणी लहानमोठ्या नोकऱ्या करून ऑडिशन देतात. अशा कलाकारांसोबत सध्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याची खळबळजनक माहिती अभिनेत्री चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) हिनं दिली आहे. तिनं सोशल मीडियाद्वारे अशा सर्व हौशी कलाकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पाहूया नेमकं काय म्हणाली चिन्मयी**?** चिन्मयी ही प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन याची पत्नी आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या ‘वाघळे की दुनिया’ (Wagle Ki Duniya) ही विनोदी मालिका मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मात्र या मालिकेमध्ये काम देण्याचं कारण सांगून नव्या कलाकारांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती चिन्मयीनं दिली. “वागळे की दुनिया’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिचे नाव वापरुन काही लोक कलाकारांची, मुख्यत्वे, लहान शहरांतील कलाकारांची दिशाभूल करत आहेत. डॅनी जोसेफ आणि प्रिसीला मॅम अशी त्यांची नावे आहेत. कृपया सावध रहा.” अशा इशारा तिने फेसबुकद्वारे दिला. सोबतच तिने या मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ‘आता तक्रार करण्याचाही वैताग आलाय’; समीर विद्वांसनं केली रंगभूमी सुरु करण्याची मागणी
तारक मेहता फेम अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव चिन्मयीने ही बाब इतरांच्या लक्षात आणून देत सगळ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. छोट्या- छोट्या गावातून येणाऱ्या नवख्या कलाकारांना चित्रपटसृष्टीबद्दल कोणतीही माहिती नसल्याने ते या टोळीच्या बोलण्याला फसतात. ‘वागळे की दुनिया’ मालिकेत अशा प्रकारे कलाकारांची निवड होत नसल्याचं सांगत चिन्मयीने कोणाच्याही फोनची शहानिशा न करता त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

)







