जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Chinmay Mandlekar: बिट्टा कराटे नंतर चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसेची भूमिका; फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

Chinmay Mandlekar: बिट्टा कराटे नंतर चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसेची भूमिका; फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर

लवकरच चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नवीन चित्रपटाचा जबरदस्त लूक समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल राउंडर अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. या अभिनेत्याने मराठी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्याने आता आज मराठीसह हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याची शिवराज अष्टक मधील सिनेमांतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर ‘द कश्मीर फाईल्स’ मधून त्याने बिट्टा कराटे या खलनायकाची भूमिका निभावली. त्याचं  विशेष कौतुक झालं. लवकरच त्याला ‘सुभेदार’ चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी त्याच्या नवीन चित्रपटाचा लूक समोर आला आहे. लवकरच चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. चिन्मय मांडलेकर येणाऱ्या काळात पुन्हा एकदा चरित्रात्मक भूमिकेत झळकणार आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चिन्मय येत्या काळात दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार संतोषी यांच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात  तो नथुराम गोडसेची भूमिका साकारणार आहे. त्याने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही  माहिती दिली आहे. हेही वाचा - Gandhi Godse Ek Yudh: शाहरुखच्या ‘पठाण’ ला ‘गांधी गोडसे एक युद्ध’ देणार बॉक्स ऑफिसवर टक्कर चिन्मयचा या चित्रपटातील लूक समोर आला असून त्याला आता नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. ही  आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी चिन्मयने त्याच्या स्वतःवर खूप मेहनत घेतलेली दिसत आहे.

जाहिरात

80दशकातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार संतोषी आता तब्बल 9 वर्षांनी बॉलिवूडमध्ये नव्या कोऱ्या चित्रपटासह पदार्पण करणार आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाची घोषणा झाली असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्ध आपण बघत आलो आहोत. बऱ्याच कलाकृतीमधून यावर भाष्यदेखील करण्यात आलं आहे. शिवाय महात्मा गांधी यांच्यावरदेखील बरेच चित्रपट बनले. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ मध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोन विरोधी विचारसरणींमधील युद्ध दाखवण्यात आले आहे. ‘गांधी- गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट पुढील प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात