मुंबई, 14 जून- प्रभास आणि क्रिती सनॉन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या लोकांनी चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. अशातच सध्या छपरी हा शब्द ट्रेंडमध्ये आला आहे. सोशल मीडियावर तो सातत्याने लोक वापरत आहेत.या सिनेमाचा आणि छपरी शब्दाचा नेमका अर्थ तरी काय आहे…याबद्दल आपण जाणून घेणार आहे. छपरी शब्दाच आणि आदिपुरुष सिनेमाचं कनेक्शन काय छपरी दिसतोयस..असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. समाजाच्या नजरेत एखादी गोष्ट चांगली नाही त्यावेळी हा शब्द वापरला जातो. प्रभास आणि क्रिती सनॉन स्टारर आदिपुरुष या सिनेमाचा पहिला शो लोक पाहून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी फक्त सिनेमा वाईट आहे असं म्हटलं नाही तर यात छपरी भाषेचा उपयोग करण्यात आला आहे अशीही टीका केली. तसंच ट्विटरवर दिवसभर छपरी हा शब्द ट्रेंडमध्ये होता. वाचा- 4 महिन्यातच मोडला होता मिथुन चक्रवर्तींचा पहिला संसार; पत्नीनं केलेले गंभीर आरोप आदिपुरुष सिनेमातल्या रावण, हनुमान, प्रभू राम यांच्या वेशभुषेची तसंच VFX ची खिल्लीही लोकांनी उडवली. सिनेमात दाखवण्यात आलेली रावणाची लंका सोन्याची नाही तर काळ्या दगडाची वाटते असंही लोकांनी मह्टलं आहे. तसंच सोशल मीडियावर लोक या सिनेमातले संवाद छपरी असल्याचं म्हणत आहेत. एकूण काय हा सिनेमा चांगला नाही असं सांगण्यासाठी छपरी या शब्दाचा वापर नेटकरी सातत्याने करत आहेत. त्यामुळेच छपरी हा शब्द ट्रेडिंगमध्ये आहे.
छपरी या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय? ‘छपरी’ हा शब्द तुम्ही गुगलवर शोधला तर अर्बन डिक्शनरीचं पेज येईल. यामध्ये लिहिलं आहे की, छपरी या शब्दाचा अर्थ एक बेजबाबदार व्यक्ती, जो ट्रेंडी हेअर कट आणि कपडे स्पेशल आणि आकर्षक दिसतो आहे असं त्याला वाटतं. पण प्रत्यक्षात मात्र ते कपडे असे असतात की ज्याला छपरी असं संबोधलं जातं. अत्यंत भडक प्रकारचे कपडे किंवा भडक प्रकारचे शूज या सगळ्यालाही छपरी म्हटलं जातं. विचित्र हेअर स्टाईललाही अनेकदा छपरी म्हटलं जातं. आपण अनेकदा म्हणतो देखील काय छपरी दिसतोयस, कशाला असा छपरी अवतार केला आहेस..त्याशीच मिळाता जुळता असा अर्थ या शब्दाचा आहे. रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’मध्ये प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणाचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका नवीन मुलाखतीत प्रेम सागरने सांगितले की, ‘मी चित्रपट पाहिला नाही, पण टीझर आणि ट्रेलर पाहिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रेम सागर म्हणाले की, ‘माझे वडील रामानंद सागर यांनीही ‘रामायण’ बनवताना स्वातंत्र्याचा वापर केला, परंतु त्यांना भगवान राम समजले होते. अनेक ग्रंथ वाचून त्यांनी त्यात किरकोळ बदल केले पण वस्तुस्थितीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न कधी केला नाही.’