Home /News /entertainment /

‘प्यार का दिवाना’वर डान्स करणाऱ्या चिमुकल्यांना ओळखा पाहू? आज आहेत बॉलिवूड सुपरस्टार्स

‘प्यार का दिवाना’वर डान्स करणाऱ्या चिमुकल्यांना ओळखा पाहू? आज आहेत बॉलिवूड सुपरस्टार्स

बॉलिवूड अभिनेत्रींचे लहानपणीचे व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्. या अभिनेत्री आज गाजवत आहेत बॉलिवूड

  मुंबई 22 मे : चिमुकल्यांचे व्हिडीओ, फोटो पाहणं सगळ्यांनाचं आवडतं. सध्या सोशल मीडिया काही लहान चिमुरड्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल दिसत आहे. पण या चिमुरड्या कोणी सामान्य नव्हे तर आता मोठ्या स्टार्स बनल्या आहेत. पण त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे. ‘ऐ मेरा दिल...प्यार का दिवाना...’ या एव्हरग्रीन गाण्यावर या चिमुकल्या डान्स करत आहेत. तर या व्हिडिओत बॉलिवूड अभिनेत्री व श्रीदेवी (Shridevi) यांची कन्या जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) डान्स करताना दिसत आहे.
  यानंतर जान्हवीची बहीण तसेच संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shananya Kapoor) देखिल डान्स करताना दिसत आहे. याशिवाय ‘स्टुडंट ऑफ इयर 2’ मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही त्यांना साथ देत आहे.
  एका रिसॉर्ट वरील हा व्हिडिओ असून कुटुंबासोबत या तिघीही वेळ घालवत आहे. त्या दरम्यान हा व्हिडिओ शुट करण्यात आला होता. अनन्या , जान्हवी आणि शनाया या एकमेकींच्या आजही चांगल्या मैत्रिणी आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. त्यांचे हटके फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतान दिसतात.

  MBBS डॉक्टर झाली सुपरमॉडेल; पाहा आदिती गोव्हित्रीकर 45व्या वर्षी दिसते कशी?

  जान्हवीने बॉलिवूड मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून पदर्पण केलं होतं. तर आता बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. त्यानंतर ती ‘घोस्ट स्टोरीज’, ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटांत दिसली. नुकताच तिचा ‘रुही’ ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर तिच्या कामाचं कौतुक झालं होतं. लवरच ती ‘दोस्ताना 2’, ‘गुड लक जेरी’ या चित्रपटांतही दिसणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ananya (@ananyapanday)

  अनन्यानेही अगदी कमी काळात बॉलिवूड मध्ये मोठं स्थान निर्माण केलं आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ नंतर ती ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पिली’ या चित्रपटांत दिसली होती. लवकरत ची ‘लायगर’ आणि आणखी एक चित्रपटातही दिसणार आहे.  अनन्याने मोठ चाहता वर्ग निर्माण केला आहे.
  अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर देखिल लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे या तिन्ही चिमुकल्या आता बॉलिवूडच्या स्टार्स बनल्या आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या