जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तरुणवयातच केलं टक्कल; 18 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; चंद्रकांता फेम अभिनेत्री आता दिसतेय अशी

तरुणवयातच केलं टक्कल; 18 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; चंद्रकांता फेम अभिनेत्री आता दिसतेय अशी

 चंद्रकांता फेम कृतिका देसाई

चंद्रकांता फेम कृतिका देसाई

प्रसिद्ध अभिनेत्रीनं तरुणवयातच भूमिकेसाठी चक्क टक्कल केलं. हा विचार करून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. असं काही करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 मे: महिलांचे सौंदर्य केसांशिवाय अपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या सौंदर्याची चर्चा होते तेव्हा तिच्या सुंदर केसांचा नक्कीच उल्लेख होतो. सगळ्याच महिला आपल्या केसांची विशेष काळजी घेतात पण त्यात अभिनेत्री तर केसांसाठी अधिकच जागरूक असतात. पण पण एक टीव्ही अभिनेत्री अशीही आहे जिने केवळ भूमिकेसाठी सुंदर केस काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तिने तरुणवयातच भूमिकेसाठी चक्क टक्कल केलं. हा विचार करून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. असं काही  करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री… 1994 साली छोट्या पडद्यावर आलेल्या चंद्रकांता या लोकप्रिय मालिकेतील ‘शब्या’ ही विषकन्या आठवतेय का? या मालिकेतील ही  विषकन्येची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. ही अभिनेत्री होती कृतिका देसाई. तिने आजवर बुनियाद, सुपरहिट मुकाबला, नूरजहाँ, मेरे अंगने में, पंड्या स्टोर यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कृतिका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण 29 वर्षांपूर्वी तिने घेतलेल्या एका निर्णयानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

News18लोकमत
News18लोकमत

सुमारे 29 वर्षांपूर्वी आलेली चंद्रकांता ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली होती. या चंद्रकांता मालिकेत विषकन्या म्हणून ‘शाब्या’ची भूमिका कृतिकाने साकारली होती. या मालिकेत भूमिकेत खरेपणा आणण्यासाठी अभिनेत्रीनं चक्क टक्कलच केलं होतं. अवघ्या तरुणवयात भूमिकेत जीव ओतण्यासाठी घेतलेल्या या निर्णयानं कृतिकाचं सगळीकडेच कौतुक झालं होतं. MET Gala 2023 साठी 4 दिवस लेकीपासून दूर राहिली आलिया; इमोशनल होत म्हणाली ‘उठताच तिला मी…’ अभिनेत्री कृतिका देसाई खान आता  55 वर्षांची झाली आहे. मात्र वयाच्या या टप्प्यावरही ती खूपच  ग्लॅमरस दिसते. कृतिका देसाई खान सध्या ‘पंड्या स्टोअर’ या टीव्ही शोमध्ये सासूची भूमिका साकारत आहे. पण खरं तर, जर तुम्ही तिचे सोशल मीडिया अकाउंट तपासले तर तुम्हाला असे दिसून येईल की वय वाढत आहे, परंतु वयानुसार ती म्हातारी होत नाही तर अधिक फॅशनेबल होत आहे.

जाहिरात

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर कृतिका ही मुंबईची रहिवासी आहे. 23 वर्षीय कृतिका तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठ्या इम्तियाज खानच्या प्रेमात पडली आणि चंद्रकांता शोदरम्यान अभिनेता अमजद खानचा भाऊ इम्तियाज खानशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली, तिचे नाव आयशा आहे. इम्तियाज खान यांचा 2020 मध्ये मुंबईत कोरोनादरम्यान मृत्यू झाला होता. कृतिका आता तिच्या मुलीसोबत राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात