जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / हिंदी सिनेमाचा 'कपटी लाला'; पडद्यावर दिसताच प्रेक्षक द्यायचे शिव्या; कोण आहे हा अभिनेता?

हिंदी सिनेमाचा 'कपटी लाला'; पडद्यावर दिसताच प्रेक्षक द्यायचे शिव्या; कोण आहे हा अभिनेता?

हिंदी सिनेमाचा कपटी लाला

हिंदी सिनेमाचा कपटी लाला

आज अशा एका कलाकाराची माहिती घेऊ या, ज्यांना आपण अनेक हिंदी सिनेमांत पाहिलेलं आहे; मात्र त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाही.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 जुलै :   स्वातंत्र्य चळवळीनंतर भारतीय सिनेजगत दोन भागांत विभागलं गेलं. 1947पूर्वी मुस्लिम कलाकार अगदी खुशीने, बिनदिक्कतपणे सिनेमांत काम करायचे; मात्र 1947मध्ये देशाची फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला व पाकिस्तान हा वेगळा देश झाला. काही जणांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही कलाकारांच्या जागा रिक्त झाल्या. त्यामुळे काही कलाकारांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी मायानगरी गाठली. त्यामध्ये काही कलाकार असेही होते, ज्यांचा स्वातंत्र्यापूर्वी फिल्मी जगताशी काहीही संबंध नव्हता. नव्या भारताच्या निर्मितीनंतर काही जणांनी मुंबई गाठली आणि सिनेमात आपलं नशीब आजमावायचं ठरवलं. त्यात ए. के. हंगल, नासिर हुसै यांसारख्या काही नामवंत कलाकारांचा समावेश होता. आज अशा एका कलाकाराची माहिती घेऊ या, ज्यांना आपण अनेक हिंदी सिनेमांत पाहिलेलं आहे; मात्र त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाही. मनोजकुमारच्या ‘रोटी, कपडा और मकान’ सिनेमात अभिनेत्री मौसमी चॅटर्जीशी गैरवर्तन करणाऱ्या ‘लाला’ला कोणी विसरणं अशक्य आहे. लालाची भूमिका निभावलेले चंद्रशेखर दुबे खऱ्या आयुष्यात क्रांतिकारक होते. स्क्रीनवर कपटी व्यक्तीच्या भूमिका निभावणारे दुबे खऱ्या आयुष्यात खूपच दयाळू व्यक्ती होते. ते सीएस दुबे या नावाने ओळखले जायचे. त्यांना कपटी आणि खोटेपणा करणाऱ्या व्यक्तींच्या भूमिका निभावण्यासाठीच ओळखलं जातं. हेही वाचा -  बॉलिवूडच्या इतिहासातील 10 सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट; काहींनी केली देशाच्या GDP पेक्षा जास्त कमाई 4 सप्टेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशात कन्नोडमधल्या एका छोट्या शहरात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच त्यांना दैवी आवाजाची देणगी होती. त्यामुळे ती आयुष्यभर रेडिओशीही संबंधित होते. सीएस दुबे क्रांतिकारी विचारांचे होते आणि देशभक्ती त्यांच्या नसानसांत भरलेली होती. महात्मा गांधीजींनी 1942मध्ये भारत छोडो चळवळ राबवली. तेव्हा दुबे सर्व काही सोडून त्या चळवळीत उतरले. 18 वर्षांचे असताना त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईत आले. अभिनेता बनायचं त्यांनी कधी ठरवलं नव्हतं; मात्र असं म्हणतात ना, की जे नशिबात लिहिलेलं असतं तेच होतं, त्याप्रमाणे झालं आणि योगायोगाने ते अभिनेते बनले. हेही वाचा -  ‘त्या क्षणी त्याच्या कानाखाली…’ पत्नी मरणाच्या दारात असताना चाहत्याची ती मागणी ऐकून संतापलेला अभिनेता एके दिवशी सीएस दुबे प्रसिद्ध दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांना भेटायला गेले. त्यांनी दुबे यांना सेटवर ऑफिस बॉय म्हणून नोकरीवर ठेवलं; मात्र दुबे आपल्या क्षमतेच्या आधारे लवकरच असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहायक दिग्दर्शक बनले. 1949मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या या अभिनेत्याने 1953 साली देव आनंद यांच्या ‘पतिता’ फिल्ममध्ये काम केलं. त्या फिल्मनेच त्यांना ओळख मिळवून दिली. त्यात त्यांनी केलेली बिहू चाचाची भूमिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर 1955मध्ये आलेल्या ‘सीमा’ नावाच्या सिनेमात त्यांनी बांकेलाल ही भूमिका केली. त्यांचा चेहरामोहराच असा होता, की त्यांना फिल्ममध्ये नकारात्मक भूमिकाच मिळायच्या. त्यांचा अभिनय इतका सच्चा होता, की भोळ्याभाबड्या प्रेक्षकांना ते खरंच वाटायचं आणि ते अक्षरशः त्यांना शिव्या द्यायचे. कपटी पुजारी, धूर्त व्यापारी, भ्रष्ट शिक्षक अशा भूमिका निभावण्यासाठीच जणू दुबे यांचा जन्म झाला असावा. वास्तव आयुष्यात सीएस दुबे समाजसेवक होते. सिनेमातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग ते गरिबांसाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायचे. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी झाली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मिस्टर अँड मिसे 55, कठपुतली, तीसरी कसम, खिलौना, रोटी कपडा और मकान, मैं तुलसी तेरे आंगन की, राम तेरी गंगा मैली अशा अनेक सिनेमांनी दुबे यांना चरित्र अभिनेत्याच्या रूपाने घराघरांत नेऊन पोहोचवलं. सीएस दुबे यांच्या अभिनयाची नक्कल नंतर अभिनेते प्रेम चोप्रा करायचे, याबद्दल खूप कमी जणांना माहिती असेल. ‘हवा महल’ आणि ‘फौजी भाईयों’ या रेडिओवरच्या कार्यक्रमांतून आपल्या आवाजाच्या माध्यमातून त्यांनी बरीच वर्षं श्रोत्यांचं मनोरंजन केलं. या महान चरित्र अभिनेत्याचा मृत्यू 28 सप्टेंबर 1993 रोजी, वयाच्या 69व्या वर्षी झाला. त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं स्पष्ट नाही; मात्र काही जाणकारांच्या मते त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात