बॉलिवूड सिनेमांच्या यशस्वितेचं गणित आतापर्यंतच्या काळात कोणीही ठोसपणे मांडू शकलेलं नाही. सिनेमा चांगला असला तरी तो बॉक्स ऑफिसवर चालतोच असं नाही आणि सिनेमा वाईट असला, तरी तो फ्लॉप होतो असंही काही नाही. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. काही सिनेमांनी मात्र उत्पन्नाचे असे विक्रम केले, की चक्रावायलाच झालं.
आमीर खानची मुख्य भूमिका असलेला दंगल हा सिनेमा 2016च्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा इतिहास रचेल याचा जराही अंदाज दिग्दर्शक नितेश तिवारी यांना नव्हता. 132 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने भारतात 538 कोटी रुपयांहून अधिक कमाई करून इतिहास रचला. या सिनेमाची जागतिक कमाई 1960 कोटी रुपयांहून अधिक होती. हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासातला आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.
शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेला पठाण हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला होता. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चालला. भारतात या सिनेमाने 654 कोटी रुपयांची कमाई केली. जागतिक पातळीवर या सिनेमाने 1050 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळावलं. कमाईच्या बाबतीत हा सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.
सलमान खान, करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या भूमिका असलेला बजरंगी भाईजान हा सिनेमा कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता. 17 जुलै 2015 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला होता. 125 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या सिनेमाने भारतात 444 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तसंच, जागतिक पातळीवर 918 कोटी रुपये या सिनेमाने कमावले होते. त्यामुळे कमाईच्या बाबतीत हा सिनेमा तिसऱ्या स्थानावर आहे.
आमीर खानची भूमिका असलेला हा सिनेमा 2017मध्ये रिलीज झाला होता. अद्वित चंदन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा खूप कमी बजेटमध्ये तयार झाला होता; मात्र त्याने भारतात 473 कोटी रुपये, तर जगभरात 918 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा क्रमांक चौथा लागतो.
राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा 122 कोटी रुपयांत तयार झाला होता. त्याने भारतात 473 कोटी रुपयांची कमाई केली होती. आमीर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने जागतिक पातळीवर 769 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर आहे.
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला सुलतान हा सिनेमा 2016मध्ये रिलीज झाला होता. आर्तर जोरावस्की यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा जगभरात 614 कोटी रुपयांची कमाई करण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे हा सिनेमा कमाईच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे.
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा 2018मध्ये रिलीज झाला होता. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने भारतात 439 कोटी रुपयांची कमाई केली होती. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने जगभरात 586 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं होतं.
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता. त्याला बराच विरोध झाला होता; मात्र रिलीज झाल्यानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने भारतात 387 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसंच, जगभरात या सिनेमाने 571 कोटी रुपये मिळवले होते. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा क्रमांक आठवा आहे.
अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 2017मध्ये रिलीज झाला होता. त्यात सलमान खानने केलेली भूमिका खूप लोकप्रिय ठरली. या सिनेमाने भारतात 434 कोटी, तर जगभरात 564 कोटी रुपयांची कमाई केली. या यादीत या चित्रपटाचा क्रमांक नववा आहे.
विजय कृष्णन आचार्य यांनी दिग्दर्शित केलेला धूम थ्री हा सिनेमा 2013मध्ये रिलीज झाला होता. त्या फिल्मने भारतात 364 कोटी, तर जगभरात 556 कोटी रुपयांची कमाई केली होती. आमीर खान आणि कतरिना कैफ यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. सर्वाधिक कमाईच्या बाबतीत या चित्रपटाचा क्रमांक दहावा आहे.