मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor, व्हायरल होतोय हा VIDEO

कोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor, व्हायरल होतोय हा VIDEO

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता राम कपूरने कोरोना प्रतिबंधक लस टोचून (Ram Kapoor Corona Vaccination) घेतली आहे. यावेळी लस घेताना राम कपूरने लहान लेकरासारखं रडायला सुरूवात केली आहे.

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता राम कपूरने कोरोना प्रतिबंधक लस टोचून (Ram Kapoor Corona Vaccination) घेतली आहे. यावेळी लस घेताना राम कपूरने लहान लेकरासारखं रडायला सुरूवात केली आहे.

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता राम कपूरने कोरोना प्रतिबंधक लस टोचून (Ram Kapoor Corona Vaccination) घेतली आहे. यावेळी लस घेताना राम कपूरने लहान लेकरासारखं रडायला सुरूवात केली आहे.

मुंबई, 04 एप्रिल: गेल्या काही काळापासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) वाढत चालला आहे. याचं पार्श्वभूमीवर देशात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील अनेक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे. बॉलीवूडमधीलही बऱ्याच कलाकारांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. दरम्यान त्यांनी देशातील लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जागरूकही केलं आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता राम कपूरने कोरोना प्रतिबंधक लस टोचून (Ram Kapoor Corona Vaccination) घेतली आहे. यावेळी लस घेताना राम कपूरने लहान लेकरासारखं रडायला सुरूवात केली आहे. या घटनेचा मजेदार व्हिडीओ (Crying Video) सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.

लस घेत असताना राम कपूरने गंमत केली आहे. इंजेक्शनला आपण घाबरत असल्याचं नाटक केलं आहे. यावेळी व्हिडीओ बनवणारी त्याची पत्नी गौतमीला देखील हसू आवरलं नाही. तिने राम कपूरला शांत बसण्यास सांगितलं. यावर राम कपूर म्हणाले की, 'हसायचं बंद कर पहिलं आणि व्यवस्थित व्हिडीओ शूट कर.' लस घेताना राम कपूरला रडताना पाहून त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यानंतर राम कपूरने हसत हसत सांगितलं की, 'मी गंमत करत होतो, पण लोकांनी गर्दी केली.'

(हे वाचा-जेनेलियाच्या नव्या व्हिडिओची धूम; हाताला दुखापत असूनही भन्नाट डान्स)

हा व्हिडीओ अभिनेता राम कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये कोरोना योद्ध्यांचं कौतुकं केलं आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'संपूर्ण देशाचं लसीकरण करण्यासाठी कोरोना योद्धे खूप मेहनत घेत आहेत. अशावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं पाहून फार छान वाटलं. सर्व कोविड योद्ध्यांना मनपूर्वक धन्यवाद!' त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतं असून अनेक चाहत्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

अलीकडेच अभिनेता राम कपूर 'थप्पड' आणि 'बहुत हुआ सन्मान' या दोन चित्रपटांत झळकला होता. याव्यतिरिक्त तो टीव्ही मालिकांसोबतच 'द बिग बुल' या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत झळकणार आहे. या चित्रपटात राम कपूर शांतीलाल मेहताच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Corona vaccination, Funny video