मुंबई, 29 ऑगस्ट: झी मराठीवरील सर्वांना कायम हसवणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या तमामा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. विनोदवीर भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, डॉ. निलेश साबळे त्यांच्या विनोदाच्या करेक्ट टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. भाऊ आणि कुशलचे बंपर जोक्स ऐकून हसून हसून पोट दुखतं. पण हवा येऊ द्या मंचावरील आतापर्यंतचा सर्वांत बंपर पंच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो बंपर पंच हवा येऊ द्याचे विनोदवीर नाही एक छोटा विनोदवीर मारणार आहे. कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे आणि प्रोमो पाहून प्रेक्षकांवर पोट धरुन हसायची वेळ आली आहे. चला हवा येऊ द्या च्या या आठवड्याच्या भागात मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार त्यांच्या फॅमिलीबरोबर सहभागी होणार आहेत. यात अभिनेता विनोदवीर अंशुमन विचारे आणि त्याची लेक अवनी, गायक मंगेश बोरगावकर आणि त्याची लेक मीरा, तसेच संदीप पाठक आणि त्याची मुलं आणि संतोष परबची फॅमिलीही उपस्थित राहणार आहे. या कलाकारांबरोबर आणि कलाकारांच्या छोट्या कलाकारांबरोबर हवा येऊ द्याचे विनोदवीर चांगलीच धम्माल उडवून देणार आहेत. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकरांनी घेतलाय महत्त्वाचा निर्णय; चावडीवर पाहायला मिळाणार नवा अंदाज
अभिनेता अंशुमन विचारेची लेक अवनी आणि गायक मंगेश बोरगावकरची लेक मीरा हिला निलेश साबळे काही मजेशीर प्रश्न विचारणार आहे. याप्रश्नांची उत्तर देताना दोन्ही चिमुरड्यांनी सगळ्यांची बोलती बंद करत पोट धरून हसायला भाग पाडलं आहे. निलेश साबळे चिमुरड्यांना प्रश्न विचारतो, ‘सगळ्यात मोठं अंड कोणाचं?’, त्यावर अंशुमनची लेक अवनी उत्तर देते ‘कोंबडीचं’. यावर सगळेच हसू लागतात. त्यावर साबळे पुन्हा विचारतो, ‘मोठं अंड कोंबडीचं मग छोट अंड कोणाचं?’, यावर मंगेशची लेक म्हणते,’ छोट्या कोंबडीचं’. मंगेशच्या लेकीनं दिलेल्या उत्तरानं सगळे बसल्या जागेवरुन उठून पोट दुखेपर्यंत हसत सुटतात. यावर संदीप पाठक म्हणतो, ‘आतापर्यंत चला हवा येऊ द्या मंचावरील सर्वात बंपर पंच होता’. संदीपच्या म्हणण्याला निलेशनं होकार देत हेच उत्तर दिलंय. सगळ्यात मोठं अंड कोंबडीचं असतं तर मग सगळ्यात छोटं अंड तर छोट्या कोंबडीचंच असेल ना. हा बंपर पंच सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

)







