जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 4 होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकरांनी घेतलाय महत्त्वाचा निर्णय; चावडीवर पाहायला मिळाणार नवा अंदाज

Bigg Boss Marathi 4 होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकरांनी घेतलाय महत्त्वाचा निर्णय; चावडीवर पाहायला मिळाणार नवा अंदाज

Bigg Boss Marathi 4 होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकरांनी घेतलाय महत्त्वाचा निर्णय; चावडीवर पाहायला मिळाणार नवा अंदाज

बिग बॉस मराठीच्या चावडीवर स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी मांजरेकरांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काय म्हणालेत मांजरेकर पाहा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 नवा अंदाजमुंबई, 29 ऑगस्ट : कलर्स मराठीवर लवकरच सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठी 4 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चौथा सीझन इतर सीझनपेक्षा नक्कीच वेगळा असेल असं शोचा प्रोमो पाहून लक्षात येत आहे. अभिनेते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी 4 होस्ट करणार आहे यावर तर शिक्का मोर्तब झाला आहे. महेश मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर यावेळी वेगळ्या पद्धतीनं स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. बिग बॉस मराठीचा नवा सीझन, नवं घर नवे खेळाडू असले तरी कार्यक्रमाचा होस्ट मात्र महेश मांजरेकरच असणार आहेत. सगळं नवं असल्यानं महेश मांजरेकर त्यांची चावडीवर शाळा घेण्यासाठीही नवी स्टाइल वापरणार आहेत. मांजरेकरांनी शो होस्ट करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्व प्रेक्षकांना माहिती आहे की, महेश मांजरेकरांनी कन्सर सारख्या मोठ्या आजारावर मात केली आहे. बिग बॉस मराठीच्या 3 सीझनवेळी मांजरेकरांवर ट्रिटमेंट सुरू होती. शरीरात अनेक ठिकाणी वेदना होत होत्या मात्र तरीही त्यांनी जिद्दीनं बिग बॉस मराठी 3 सक्सेसफुली होस्ट केला. तिसऱ्या सीझननंतर मांजरेकर शो होस्ट करणार नाहीत असं सर्वांना वाटलं होतं. मात्र मांजरेकर आता नव्यानं सज्ज झालेत आणि बिग बॉस मराठी 4 च्या होस्टिंगची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘या’ दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक?

जाहिरात

बिग बॉस पाहणारे प्रेक्षक शनिवार आणि रविवारी भरणाऱ्या चावडीची आतुरतेनं वाट पाहत असतात.  संपूर्ण आठवड्यात स्पर्धकांनी केलेल्या चुका, काढलेल्या खोड्या, घातलेल्या शिव्या सगळ्यांची शाळा मांजरेकर घेताना दिसतात. अनेकदा स्पर्धकांवर मांजरेकर प्रचंड भडकताना देखील प्रेक्षकांनी पाहिलं आहे. यावेळी ही मांजरेकरांचा हा अंदाज पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी बिग बॉस मराठी 4 चा एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात मांजरेकर राग शांत करण्याचे 101 उपायांविषयी बोलत आहेत. या प्रोमोमध्ये मांजरेकरांच्या हातात राग शांत करण्याचे 101 उपाय असं पुस्तकही दिसत आहे. ते म्हणतायत, ‘यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचं. चिड चिड करायची नाही’.  असं म्हणून मांजरेकर मात्र प्रोमोमध्ये स्वत: हसताना दिसत आहेत.  प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे मांजरेकर खरंच शांतपणे स्पर्धकांची चावडीवर शाळा घेणार का? असं प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी 4 कधी सुरू होणार? असा प्रश्न वारंवार विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात