जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही; चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे अडचणीत

त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही; चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे अडचणीत

अंकुर वाढवे

अंकुर वाढवे

चला हवा येऊ द्या चा अभिनेता अंकुर वाढवे देखील अडचणीत सापडला आहे. त्यानं थेट पोलिसांत धाव घेतली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  30 डिसेंबर :  सगळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. कलाकार देखील कामावरून सुट्ट्या घेऊन पार्टी करण्याच्या मुडमध्ये आहेत.  नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांची धम्माल सोशल मीडियावर  पाहायला मिळत आहे. अशातच सोशल मीडियावर हॅकर्सचा चांगलाच सुळसुळाट पाहायला मिळतोय. कलाकारांचे फेसबुक हॅक होणं ही आता नवीन बाब राहिलेली नाही. मागच्या काही महिन्यात अनेक कलाकारांचे अकाऊंट हॅक झाले आहेत. अशातच आता चला हवा येऊ द्या चा अभिनेता अंकुर वाढवे देखील अडचणीत सापडला आहे. अंकुरचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्यानं दिली आहे. अंकुरनं सायबर पोलिसात धाव घेतली असून या प्रकरणाची तक्रार केली आहे. अभिनेता अंकुर वाढवे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. चला हवा येऊ द्या चे अनेक व्हिडीओ तसंच अनेक वैयक्तिक फोटो शेअर करत असतो. मात्र फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावरून अश्लील गोष्टी पोस्ट होऊ लागल्या. ही गोष्ट अंकुरच्या लक्षात येताच त्यानं थेट सायबर पोलिसांत याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्वरित याची माहिती त्यानं त्याच्या चाहत्यांना दिली. हेही वाचा - Marathi Serials : वर्षा अखेरीसही दीपा अरुंधतीचीच बाजी; TRPमध्ये कोण कुठेय बघा अंकुरचं फेसबुक पेज हँक झाल्यानं त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली ही माहिती दिली आहे. तसंच त्यानं सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत देखील शेअर केली आहे. त्यानं पोस्ट शेअर करत म्हटलंय, मित्रानो माझे फेसबुक पेज काही दिवसांपासून हॅक झालेले आहे त्यावर जे पोस्ट होतंय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. बऱ्याच मित्रांनी मला कॉल व मेसेज करून याबद्दल माहिती देऊन चिंता व्यक्त केली.  तदसंबंधी मी आजच सायबरला तक्रार दाखल केलीय काळजी नसावी आणि असच पाठीशी उभे रहा धन्यवाद!

जाहिरात

त्याचप्रमाणे अंकुरनं  ‘सतर्क रहा माझ्या या पेज वरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्षित करा नशिबाने अजून तसे कोणाला मेसेज नाही आले. ही महिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहचवा, असं आवाहन केलं आहे. अंकुरचं फेसबुक अकाऊंट हे 24 डिसेंबरला हॅक झाले आहे. अकाऊंट हॅक करून अंकुरची बदनामी करण्यात आली. फेसबुक अकाऊंट कोणी हॅक केलं आणि त्याचे लोकेशन काय आहे याची माहिती देण्याची विनंती त्यानं सायबर पोलिसांना केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अंकुर सध्या चला हवा येऊ द्या मध्ये काम करतोय. तसंच वासूची सासू  हे त्याचं नाटक सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात