अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या शिव्या बागी-3 साठी पडल्या महागात

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या शिव्या बागी-3 साठी पडल्या महागात

सेन्सॉर बोर्डाकडून अनेकदा चित्रपटांमधील बऱ्याच दृश्यांवर कात्री लावली जाते. असाच प्रकार बागी 3 च्या बाबतीत घडला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मार्च :  सेन्सॉर बोर्डाकडून अनेकदा चित्रपटांमधील बऱ्याच दृश्यांवर कात्री लावली जाते. असाच प्रकार बागी 3 च्या बाबतीत घडला आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख बागी-3 मध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच टायगर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसतो आहे. आहे. या ट्रेलरची चर्चा आणखी एका कारणामुळे झाली आणि ते म्हणजे श्रद्धा कपूरने ‘बीप’ वापरून दिलेल्या शिव्या! जरी श्रद्धाने अर्धी शिवी देऊन त्यानंतर ‘बीप’ म्हटलं असलं तरी हे दृश्य काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटात श्रद्धा बऱ्याच दृश्यांमध्ये शिवीगाळ करताना दाखविली आहे. ती हा शब्द पूर्ण बोलत नसून अर्ध्या शब्दानंतर बीप बोलते. ट्रेलरमध्ये सुद्धा याची झलक दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्याठिकाणी शिवी आहे, त्याठिकाणी मिळता-जुळता दुसरा शब्द वापरण्यात आला आहे.

(हे वाचा-'विवाहित माणसाच्या प्रेमात पडू नका', कुमारी माता झालेल्या अभिनेत्रीने दिला सल्ला)

त्याचप्रमाणे सिनेमातील अनेक दृश्य हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. लहान मुलाला मारणे, एका व्यक्तीला जाळणे, बहिऱ्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक देणे यांसारखी अनेक दृश्य यातून कापण्यात आली आहेत. तसंच या सिनेमातील दिशा पाटनीचं गाणं ‘Do you Love me’ मधील अनेक क्लोज शॉट्स हटवण्यात आले आहेत.

बागी-3 मधील डायलॉग्समुळे सध्या सोशल मीडियावर खूप मीम्स बनत आहेत. त्याचप्रमाणे त्यातील 'दस बहाने' या गाण्याला देखील संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यातच सिनेमातील अनेक दृश्यांना कात्री लागली आहे.

अन्य बातम्या

'विवाहित माणसाच्या प्रेमात पडू नका', कुमारी माता झालेल्या अभिनेत्रीने दिला सल्ला

आजोबांची भूमिका पडद्यावर साकारणार त्यांचाच नातू, 'मी वसंतराव'चं पोस्टर रिलीज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2020 04:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading