दोनदा घटस्फोट, वादग्रस्त आयुष्य; आता 'हा' स्टार 25 वर्षांच्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये

दोनदा घटस्फोट, वादग्रस्त आयुष्य; आता 'हा' स्टार 25 वर्षांच्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये

हा स्टार आज 47 वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड करिअर पेक्षा त्याचं खासगी जीवनच जास्त चर्चेत राहीलं.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात आणि प्रेमात पडण्यासाठी काही वेळाचं बंधन नसतं. असंच काहीसं झालंय बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत. बॉलिवूड करिअर पेक्षा अनुरागचं खासगी जीवनच जास्त चर्चेत राहीलं. बॉलिवूडमध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या अनुराग कश्यप आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या लव्ह लाइफ बद्दल काही रंजक गोष्टी...

अनुरागची आत्तापर्यंत दोन लग्न होऊन त्यानंतर घटस्फोट सुद्धा झाले आहेत आणि सध्या तो स्वतःहून 22 वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणीला डेट करत आहे. मूळचा गोरखपूरचा असेलेला अनुराग कश्यप वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखला जातो. मात्र सध्या तो त्याच्या लव्ह लाइफबद्दल प्रचंड चर्चेत आहे. अनुराग सध्या शुभ्रा शेट्टी नावाच्या एका मुलीला डेट करत असून तिचं वय 25 असल्यातचं बोललं जातं. सुरुवातीला अनुरागनं त्याचं हे नातं मीडियापासून लपवून ठेवलं होतं. मात्र त्यानं स्वतःचा सोशल मीडियाच्या माध्यमातून या नात्याची कबुली सुद्धा दिली.

परदेशात 11 महिने 11 दिवस कॅन्सरवर उपचार घेऊन ऋषी कपूर यांची घरवापसी

 

View this post on Instagram

 

Love ❤️

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

एका मुलाखतीत अनुरागनं त्याच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला. अनुराग म्हणाला, ‘सर्वांना प्रेम करायचा अधिकार. मी प्रेमाचा खूप आदर करतो. मग ते 90 व्या वर्षी झालेलं प्रेम असो वा आणखी काही. मी तुटलेलं हृदय घेऊन जगण्यात वेळ वाया घालवू शकत नाही. ब्रेकअप नंतर दुःखी होऊन जगण्यापेक्षा मी पुन्हा प्रेमात पडण्यावर विश्वास ठेवतो.’ अनुरागच्या मुलीसोबत त्याची गर्लफ्रेंड शूभ्राचं बॉन्डिंग खूप चांगलं असल्याचं बोललं जातं. अनुराग अनेकदा शुभ्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आली लग्न घटी! श्रीदेवींची नवराई 'या' मंदिरात करणार लग्न

 

View this post on Instagram

 

Hainnnnnnn????

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

अनुरागनं पहिल्यांदा 2003 मध्ये आरती बजाजशी लग्न केलं होतं. त्याचं हे नातं 2009 मध्ये तुटलं आणि हे दोघं वेगळे झाले. त्यानंतर अनुरागनं 2011 मध्ये अभिनेत्री कल्की कोचलीनशी लग्न केलं मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2015मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अनुरागनं तिसरं लग्न केलं नसलं तरीही मागच्या बऱ्याच काळापासून शुभ्राला डेट करत आहे.

...म्हणून विराट- अनुष्काला म्हटलं जातं स्टायलिश कपल

===================================================================

VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक

Published by: Megha Jethe
First published: September 10, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading