• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘वडिलांनी माझ्या स्वप्नांचा जीव घेतला’; ब्रिटनीने पुन्हा एकदा साधला निशाणा

‘वडिलांनी माझ्या स्वप्नांचा जीव घेतला’; ब्रिटनीने पुन्हा एकदा साधला निशाणा

आता पुन्हा एकदा तिने आपल्या वडिलांवर निशाणा साधला. त्यांनी माझ्या स्वप्नांचा जीव घेतला असं ती म्हणाली.

 • Share this:
  मुंबई 18 जुलै: प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री ब्रिटनी स्पिअर्स (Britney Spears) हिचे आपल्या वडिलांसोबत पालकत्वावरून वाद सुरु आहेत. “माझ्या वडिलांनी मला इतके वर्ष कोंडून ठेवलं. त्यांनी माझी संपत्ती बळकावली. माझं आर्थिक शोषण केलं असे गंभीर आरोप ब्रिटनीने आपल्या वडिलांवर केले आहेत.” सध्या हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. (this conservatorship killed my dreams) याच दरम्यान आता पुन्हा एकदा तिने आपल्या वडिलांवर निशाणा साधला. त्यांनी माझ्या स्वप्नांचा जीव घेतला असं ती म्हणाली. “या कन्ज़रवेटरशिपने माझ्या स्वप्नांचा जीव घेतला. या प्रतिकूल परिस्थितीतून मी निघू शकेन का? मला माहित नाही. माझ्यावर काही जण टीका करत आहेत. त्यांना माझी स्थिती कळणार नाही. वडिलांनी माझं आयुष्य जगणं मुश्किल केलं आहे. त्यांनी माझी स्वप्न, महत्वाकांक्षा, माझं करिअर सर्व गोष्टींचा जीव घेतला.” अशा आशयाची पोस्ट करत ब्रिटनीने पुन्हा एकदा आपल्या वडिलांवर टीका केली. आयरा खानचा मोठा खुलासा; Self careच्या नावाखाली करत होती स्वत:चं नुकसान
  ‘…त्यावेळी उपचारासाठी नव्हते पैसे’; नाना पाटेकर वडिलांच्या आठवणीनं झाले भावुक नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? ब्रिटनी 39 वर्षांची आहे. तिचे वडील जेमी स्पीयर्स तिच्या पर्सनल लाइफ संबंधित सगळे निर्णय घेतात. या आधी ब्रिटनी मारहाण केल्याने, मानसिक आरोग्य ठीक नसल्याने आणि मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे चर्चेत आली होती, अशा परिस्थितीत तिचे वडील जॅमी यांना 2008 मध्ये ब्रिटनीला Conservator म्हणजेच तिला सांभाळणारे म्हणून नियुक्त केले होते. दरम्यान ब्रिटनीने तिच्या वडिलांचा तिच्या आयुष्यात असणाऱ्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला. तिच्या वडिलांवर असलेल्या इतर आरोपांसोबतच त्यांना दारुचं व्यसन असल्याचा आरोपही तिने केला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनीच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की ब्रिटनीला तिच्या वडिलांची भीती वाटत होती. ब्रिटनी सुमारे 445 कोटी रुपयांची मालक आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: