जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'इतकं खास नातं इतर कलाकारांसोबत नव्हतं, कारण..'; लतादीदींच्या निधनानंतर ढसाढसा रडला रुग्णालयातील स्टाफ

'इतकं खास नातं इतर कलाकारांसोबत नव्हतं, कारण..'; लतादीदींच्या निधनानंतर ढसाढसा रडला रुग्णालयातील स्टाफ

'इतकं खास नातं इतर कलाकारांसोबत नव्हतं, कारण..'; लतादीदींच्या निधनानंतर ढसाढसा रडला रुग्णालयातील स्टाफ

रुग्णालयातील स्टाफपैकी अनेकजण त्यावेळी अतिशय भावुक झाले जेव्हा डॉक्टरांनी लतादीदींचं निधन झाल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर यानंतर अनेक नर्सच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः अश्रू आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 08 फेब्रुवारी: आपल्या शेवटच्या दिवसांत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनामुळे रुग्णालयातच दिवस काढावे लागले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. मात्र या रुग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफसोबतही लतादीदींचं विशेष नातं होतं. रुग्णलयात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार गानसम्राज्ञी लता मंगेशकर या रुग्णलयात मागील 3 दशकांपासून येत होत्या. रुग्णलयातील केअर टेकरने सांगितलं, की आम्ही डोळ्यांसमोर त्यांचं वय वाढताना पाहिलं आणि आमच्यात एक खास नातं निर्माण झालेलं होतं (Lata Mangeshkar’s Bond with Breach Candy Staff) . रुग्णालयातील स्टाफपैकी अनेकजण त्यावेळी अतिशय भावुक झाले जेव्हा डॉक्टरांनी लतादीदींचं निधन झाल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर यानंतर अनेक नर्सच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः अश्रू आले.

‘दीदींसोबत राष्ट्रगीत गाणं मोठं भाग्य’, कार्तिकी गायकवाडची आदरांजली

लतादीदींची 25 वर्षांपासून काळजी घेणाऱ्या एका परिचारिकेने सांगितलं कि, ‘आम्ही अनेक कलाकारांवर उपचार करतो, मात्र त्यांच्यासोबत बोलताना आम्ही कोणत्याही खासगी गोष्टींबद्दल गप्पा मारत नाही आणि सगळे नियम काटेकोरपणे पाळतो. मात्र, लतादीदींच्या बाबतीत असं नव्हतं. लतादीदी स्वतःच संभाषण सुरू करायच्या. कर्मचार्‍यांना ऑटोग्राफ देताना त्या कधीच मागेपुढे पाहत नव्हत्या’. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तब्येतीच्या काही समस्यांमुळे रुग्णालयात दाखल झाल्या की त्या गाणी, विशेषत: गझल ऐकायच्या. असं नर्सने सांगितलं. मात्र, स्टाफसाठी असलेल्या हॉस्पिटलच्या नियमांचा हवाला देऊन त्यांनी रेकॉर्डवर बोलण्यास नकार दिला. लता दीदी आणि श्रद्धाचं नातं होतं फारच खास, अभिनेत्रीने शेअर केले Unseen Photo नर्सने पुढं सांगितलं, कि यावेळी त्या अतिशय नाजूक स्थितीत दिसत होत्या. कोरोनामुळे आयसीयूमध्ये त्यांना भेटण्यावरही कडक निर्बंध होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी हेल्थकेअर कर्मचारी आयसीयूच्या दाराच्या काचेतून डोकवत असत. लतादीदी हे अतिशय विनम्र व्यक्तीमत्व होतं, असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात