मुंबई, 21 ऑगस्ट: बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’. हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होत आहे. या दोघांव्यतीरिक्त चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन, दीपिका पदुकोण अशी तगडी स्टार कास्ट पहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी अनेक निरनिराळी माहिती समोर येत असतानाच आणखी एक अपडेट समोर आलीये. ‘ब्रह्मास्त्र’ची कथा लीक झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ब्रम्हास्त्रची स्टोरी व्हायरल होत असलेली पहायला मिळतेय. चित्रपटातील खरी खलनायिका कोण असणार आहे हे वाऱ्यासारखं पसरतंय. खरी खलनायक मौनी रॉय नसून आलिया भट्ट असेल. लोकांचा असा विश्वास आहे की आलिया भट्ट रणबीर कपूरला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवेल आणि शिवाच्या माध्यमातून इतर सर्व शस्त्रांपर्यंत पोहोचेल. ईशा म्हणजेच आलिया भट्ट ही देखील स्वतः एक शस्त्र असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हेही वाचा - Kapil Sharma चा नवा लुक पाहिला का?; जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, पाहा PHOTO या चित्रपटात दीपिकाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. या चित्रपटात बिग बी शिवाचे गुरू असणार आहेत. त्याचे पात्र शिवाला त्याच्या शक्तींच्या जवळ घेऊन जाईल. अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या व्यक्तिरेखेचे छुपे कारस्थान असल्याचीही अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे आता यातील किती खरं आणि किती खोटं हे चित्रपट पाहिल्यावर कळेल. दरम्यान, बॉयकॉटच्या शर्यतीत प्रेक्षकांनी अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटही गुंडाळला आहे. अशा परिस्थितीत 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा आहेत. त्यातच आता स्टोरी लीक झाल्याच समोर आलंय. त्यामुळे याविषयी किती सत्यता आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.