Home /News /entertainment /

20 वर्षानंतर सीरिअल किलर फासावर; ४७ वार करून केली होती अभिनेत्रीची हत्या

20 वर्षानंतर सीरिअल किलर फासावर; ४७ वार करून केली होती अभिनेत्रीची हत्या

2001 साली माइकल थॉमस गॅर्जूलो यानं अॅश्टन कुचरची प्रयसी एश्ले एलरिन हिची हत्या केली होती.

    मुंबई 17 जुलै: स्टिव्ह जॉब्स यांच्या बायोपिकमुळे प्रसिद्ध झालेला अॅश्टन कुचर (Ashton Kutcher) हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याची प्रेयसी अभिनेत्री एश्ले एलरिन (Ashley Ellerin) हिची चाकू मारून हत्या करण्यात आली होती. आज तब्बल 20 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आरोपी माइकल थॉमस गॅर्जूलो (Michael Thomas Garzulo) याला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. परिणामी अॅश्टनसोबतच त्याच्या चाहत्यांनी देखील कोर्टाच्या या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. ‘मोमोमुळे कुटुंबीय माझ्यावर ओरडतात’; मिराला भूमिकेतून बाहेर पडणं जातेय अवघड 2001 साली माइकल थॉमस गॅर्जूलो यानं अॅश्टन कुचरची प्रयसी एश्ले एलरिन हिची हत्या केली होती. त्यावेळी एश्ले एक लोकप्रिय मॉडेल म्हणून नावारुपास येत होती. सर्वत्र तिच्याच सौंदर्याची चर्चा होती. तिला काही हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या होत्या. परंतु याच दरम्यान तिची हत्या झाली. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपीनं तिच्या शरीरावर तब्बल 47 वार केले होते. अत्यंत निघृण पद्धतीने तिची हत्या करण्यात आली होती. ‘अशा भूमिका नकोच, कारण…’; आई व्हायचं नव्हतं म्हणून अभिनेत्रीनं सोडली मालिका त्यावेळी हे प्रकरण ‘बॉय नेक्स्ट डोअर किलर’ (Boy Next Door Killer) या नावानं चर्चेत होतं. कारण अशाच प्रकारे यापूर्वी देखील काही मॉडेलची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सिरीअल किलिंगचे असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अखेर सखोल तपास केल्यानंतर आरोपी माइकल थॉमस गॅर्जूलो याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तब्बल 20 वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरु होतं. परंतु अखेर योग्य पुराव्यांमुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला अन् त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Actress, Crime, Entertainment, Hollywood

    पुढील बातम्या