मुंबई, 11 नोव्हेंबर : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांचा आज 64 वा वाढदिवस. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1955 ला झाला होता. बोनी यांनी बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहीट सिनेमे दिले. यात ‘हम पांच’, ‘वो सात दिन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘रूप राजा चोरों की रानी’, ‘लोफर’, ‘जुदाई’, ‘नो एंट्री’, ‘रन’, ‘वॉन्टेड’, ‘मॉम’ या सिनेमांचा समावेश आहे. याच दरम्यान सुरुवातीच्या सिनेमांच्या काळात श्रीदेवी यांच्याशी त्यांची जवळीक वाढत गेली आणि कालांतरानं या दोघांनी लग्नही केल. या दोघांना जान्हवी आणि खूशी अशा दोन मुलीसुद्धा आहेत. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यातील बॉन्डिंग कमालीचं होतं असं बोललं जातं. मात्र एक अशी गोष्ट होती ज्यामुळे श्रीदेवी बोनी कपूर यांच्यावर रागावत असत. निधनापूर्वी दिलेल्या एक मुलाखतीत खुद्द श्रीदेवी यांनीच या गोष्टीचा खुलासा केला होता. जेव्हा बोनी कपूर श्रीदेवींना त्यांच्या वयाची आठवण करुन देत असत त्यावेळी त्यांना या गोष्टीचा खूप राग येत असे असं श्रीदेवींना त्यांच्या या मुलाखतीत सांगितलं होतं. या गोष्टीवरुन त्या बोनी कपूर यांच्याशी खूप भांडत असत. Bigg Boss 13 : तुम्हीच माझे पहिले पती, ‘बिग बॉस’वर राखी सावंतचा धक्कादायक आरोप
श्रीदेवी यांनी सांगितलं होतं, की त्यांना त्यावेळी बोनी कपूर यांचा खूप राग येतो जेव्हा ते श्रीदेवींना त्यांनी 50 वर्षं बॉलिवूडमध्ये काम केलं आहे आणि त्या वयानं इतरांपेक्षा खूप मोठ्या आहेत याची आठवण करुन देत असतं. तसं पाहायला गेलं तर श्रीदेवी यांचं रागावणं अपेक्षित होतं कारण त्या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्रींपैकी एक होत्या. ज्याप्रमाणे आजही रेखा यांच्या सौंदर्याचं कौतुक करताना लोक थकत नाहीत तशीच स्थिती श्रीदेवी यांची होती. त्यासुद्धा वयाची 50 वर्ष पूर्ण केल्यानंतरही तेवढ्याच तरुण दिसत होत्या.
श्रीदेवी त्यांचा लुक आणि मेकअपची खास काळजी घेत असत. त्यांनी त्यांची स्किन कधीच डल पडू दिली नाही. तसेच अगदी एअरपोर्ट लुकच्या बाबतीतही त्या फार सजग होत्या. नेहमी परफेक्ट राहणं त्यांना आवडायचं. असं म्हटलं जातं की, श्रीदेवी जेव्हा एखाद्या फंक्शनसाठी तयार होत असत त्यावेळी त्यासाठी त्यांना अनेक तास लागत असत. अशावेळी त्या तयार होऊन बाहेर निघाल्यावर त्यांच्या लुकवर सर्वांच्या नजरा खिळून राहत मात्र अशात बोनी कपूर मात्र त्याठिकाणीही त्यांची खिल्ली उडवत असत आणि मग श्रीदेवी यांचा पारा चढत असे. पण त्यांचं हे भांडण पती-पत्नीच्या परफेक्ट नात्याचा एक भाग राहिला. सैफ अली खान इन्स्टाग्रामवर वापरतो सिक्रेट अकाउंट, चॅट शोमध्ये केला खुलासा
आता श्रीदेवी आपल्यात नाहीत मात्र कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा त्यांची आठवण केली जाते त्यावेळी नेहमीच बोनी कपूर भावूक झालेले पाहायला मिळतात. याशिवाय बोनी कपूर यांच्या मोना शौरी यांचंही निधन झालं आहे. बोनी आणि मोना यांना दोन मुलं आहेत. अर्जुन आणि अंशुला कपूर. एकीकडे अर्जुन बॉलिवूडमध्ये जम बसवताना दिसत आहे. तर दुसरीकडे श्रीदेवी-बोनी यांची मुलगी जान्हवीनं सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘आयफेल टॉवर’वर कुणी केलं होतं प्रपोज? शिल्पा शेट्टीचा धमाकेदार खुलासा ==================================================================== नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO

)







