जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सैफ अली खान इन्स्टाग्रामवर वापरतो सिक्रेट अकाउंट, चॅट शोमध्ये केला खुलासा

सैफ अली खान इन्स्टाग्रामवर वापरतो सिक्रेट अकाउंट, चॅट शोमध्ये केला खुलासा

सैफ अली खान इन्स्टाग्रामवर वापरतो सिक्रेट अकाउंट, चॅट शोमध्ये केला खुलासा

सैफचं फेसबुक किंवा इन्स्टाग्राम व्हेरिफाइड अकाउंट नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 नोव्हेंबर : बॉलिवूडमधील अनेक कलाकार चाहत्यांशी थेट कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. पण काही असेही कलाकार आहेत जे सोशल मीडियापासून लांब आहेत. यातील एक म्हणजे सैफ अली खान. सैफचं फेसबुक किंवा इन्स्टाग्राम व्हेरिफाइड अकाउंट नाही. मात्र सैफनं नुकतंच त्याचं इन्स्टाग्रामवर सिक्रेट अकाउंट असल्याचा खुलासा एका चॅट शोमध्ये केला. सैफनं अरबाज खानचा शो ‘पिंच बाय अरबाज खान’मध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी सैफला सोशल मीडियावर काय घडतं हे जाणून घेण्यासाठी तू काय करतोस असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यानं आपण इन्स्टाग्रामवर असून मी माझ्या सिनेमातील एका भूमिकेच्या नावानं एक अकाउंट बनवलं असून तेच अकाउंट मी वापरतो असं सांगितलं. याआधी काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खाननंही ती इन्स्टाग्राम वापरत असल्याचं सांगितलं होतं. खुल्लम खुल्ला प्यार करे! ‘या’ 5 कपल्सनी दिली नात्याची जाहीर कबुली

जाहिरात

सैफ सांगतो, ‘मी शकुन कोठरी नावानं एक इन्स्टाग्राम अकाउंट वापरतो. हे माझ्या बाजार या सिनेमातील माझं भूमिकेचं नाव आहे. मला माहित नाही हे मला कधीपर्यंत सूट करेल. मी बराच काळ हा विचार करण्यात घालवतो की बाकी लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील. लोक या फोटोमबद्दल काय विचार करत असतील. मला हेही माहित नाही की यामध्ये मजा येते की नाही पण मला लोकांशी फार बोलायला नाही आवडत. पण कमेंटच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण आणि काही मोजक्या व्यक्तींचे सल्ले माझ्यासाठी महत्वाचे आहेत.’ फॅमिलीसाठी पुन्हा एकत्र आले अरबाज-मलायका, पाहा PHOTO OMG! तीन खोल्यांएवढी मोठी आहे शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची बाथरुम ============================================================ VIDEO: सराफाच्या दुकानात दरोडा, लाखो रुपयांचे दागिने केले लंपास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात