बॉलिवूडपासून 13 वर्ष दूर राहिल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करणार आहे.
शिल्पा शेट्टीने वयाच्या 15 व्या वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात केलीय. लक बाय चांस हा तिचा पहिला चित्रपट होता.
सतत काम करून कंटाळा आला होता. लग्नानंतर ब्रेक पाहिजे होता. करियर बरोबरच घरही तेवढच महत्त्वाचं असतं त्यामुळेच ब्रेक घेतल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलंय.
राज कुंद्राने मला 'आयफेल टॉवर'जवळ प्रपोज केलं असा खुलासाही तिने केलाय. राजने आधीच माझ्या आई वडिलांना बोलून घेत सगळं ठरवून टाकलं होतं असंही तिने सांगितलंय.