जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hot Photoshoot का करत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनचा जबरदस्त रिप्लाय

Hot Photoshoot का करत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनचा जबरदस्त रिप्लाय

Hot Photoshoot का करत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनचा जबरदस्त रिप्लाय

अभिनेत्री विद्या बालनचा मजेशीर अंदाजही अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो. आताही पुन्हा एकदा यामुळे विद्या बालन चर्चेत आहे. विद्याने सोमवारी चाहत्यांशी बातचीत करताना अशाच काही प्रश्नांना मजेशीर उत्तरं दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च: अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan Latest News) तिच्या पॉवरफुल परफॉरमन्ससाठी ओळखली जाते. ‘कहानी’ असो किंवा ‘इश्किया’ किंवा अगदी अलीकडेच आलेले ‘शेरनी’, ‘शकुंतला देवी’ यामध्ये विद्याचा पॉवरपॅक्ड अभिनय पाहायला मिळाला. दरम्यान अभिनेत्रीचा मजेशीर अंदाजही अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो. आताही पुन्हा एकदा यामुळे विद्या बालन चर्चेत आहे. विद्याने सोमवारी चाहत्यांशी बातचीत करताना अशाच काही प्रश्नांना मजेशीर उत्तरं दिली. इन्स्टावर विद्या बालनने Ask away or tell me something असे सेशन (Vidya Balan Instagram) घेतले होते. त्यावेळी एका चाहत्याने तिला विचारले की, हॉट फोटोशूट का करत नाही. त्यावर दिलेल्या उत्तरात विद्याचा हजरजबाबीपणा पाहायला मिळाला. विद्याला या प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तिचं वजन, अपकमिंग मुव्हीज आणि आवडते कलाकार याविषयी तिला प्रश्न विचारण्यात आले. तिने गंगुबाई काठियावाडीमध्ये आलियाचं काम आवडलं असल्याचंही यावेळी सांगितलं. तसंच तुझं वय काय या प्रश्नावर पण तिने मजेशीर फोटो पोस्ट केला आहे. तिने फक्त गुगलचा फोटो पोस्ट करत काहीही न सांगता ‘गुगल करा’ असा सल्ला दिला.

जाहिरात

यावेळीच एका चाहत्याने तिला विचारलं की हॉट फोटोशूट का करत नाही. या हॉट फोटोशूटवरच्या प्रश्नावर तिने दिलेलं उत्तर फारच जबरदस्त होतं. चाहत्याच्या या प्रश्नावर विद्या बालन म्हणाली की, सध्या ‘हॉट’ आहे (गरम होत आहे) आणि मी शूटिंगही करत आहे. तर मग हे हॉट फोटोशूटच झाले ना?’

News18

विद्या बालनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा नवाकोरा सिनेमा 18 मार्च रोजी Amazon प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ‘जलसा’ असं आहे. हे वाचा- एकाच दिवशी आणि एकाच वेळी रणवीर आणि अल्लू आमनेसामने! वाचा काय आहे ही फाइट? विद्या बालनच्या जलसा या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांची वाहवा मिळवत आहे. दरम्याव या सिनेमामध्ये विद्या बालनसह अभिनेत्री शेफाली शाह देखील असणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच विद्याने चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात