गेल्यावर्षी डिसेंबरपासून या दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. 83 बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी अनेकांनी यातील भूमिका चपखल असल्याचे म्हटले आहे. रणवीर सिंग-दीपिका पादुकोण स्टारर या सिनेमाचे त्यामुळे विशेष कौतुक झाले. तर अल्लू अर्जून-रश्मिकाच्या 'पुष्पा-द राइज' या सिनेमाला फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशाने डोक्यावर घेतले. यातील गाणी, डायलॉग्स, अॅक्शन सर्व काही सुपरहिट झालं आहे. आजही सोशल मीडियावर हा सिनेमा ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट टेलिव्हिजनवर पाहता येणार म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच! दोन्ही सिनेमांमध्ये कथा वेगवेगळ्या, जॉनर वेगवेगळा आहे. पण एक यामध्ये सारखीच आहे. ती म्हणजे हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले आहेत.View this post on Instagram
लवकरच IPL सुरू होणार असल्याने एक आठवडा आधी पुष्पा चित्रपट टेलिव्हिजनवर दाखवला जात आहे. याआधीही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पण कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर दाखवला जाणार आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरानंतर कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद झाली होती आणि त्यामुळे क्रिकेट-सिनेमाप्रेमींची निराशा झाली होती. पण आता टेलिव्हिजवर हा 1983 च्या क्रिकेट वर्ल्डकप विजयाची कहाणी पाहता येणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Allu arjun, Deepika padukone, Ranveer singh, Rashmika mandanna