मुंबई, 25 ऑगस्ट- सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये मनोरंजन सृष्टीतील कलाकारांबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठीसुद्धा अनेक लोक धडपड करत असतात. या सेलिब्रेटींसाठी त्यांचे चाहते विविध हटके गोष्टी करत असतात. अशातच अनेक चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीबाबत जास्तीत-जास्त जाणून घ्यायला आवडतं. त्यांना आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसायचा हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. आज आपण अशाच एका सुपरस्टारच्या बालपणीचा फोटो पाहणार आहोत. या फोटोमधील सेलिब्रेटीनं सध्या आपल्या अभिनय आणि हॅन्ड्सम लुकने अनेक तरुणींना अक्षरशः वेड लावलं आहे. सध्या शोधलं मीडियावर एक फोटो पाहायला मिळत आहे. यामध्ये एक चिमुकला आपल्या आजोबांच्या कडेवर बसलेला दिसून येत आहे. लाल स्वेटर घातलेला, अगदी बोलके डोळे असणारा हा चिमुकला नेमका आहे तरी कोण? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हा चिमुकला मुलगा आज एक बॉलिवूड स्टार आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने फारच कमी वेळेत हे यश संपादन केलं आहे. फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा दुसरा कुणी नसून बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आहे. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे, हा मुलगा कार्तिक आर्यनच आहे. वास्तविक कार्तिक आर्यनने फार दिवसांपूर्वी हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. त्याच्या आजोबांचं निधन झाल्यानंतर यांच्या आठवणीत भावुक होत अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली होती. सध्या हा फोटो पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यन आज बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्याजवळ एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट आहेत. नुतीक्च त्याच्या ‘भुलभुलैय्या २’ या चित्रपटाला अफाट यश मिळालं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
(हे वाचा: Vijay Deverkonda: विजय देवरकोंडानं कधीही कुणाला म्हटलं नाही I Love You Too, उघड केलं कारण **)** कार्तिक आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी तो सारा अली खानसोबत नात्यात होता असं बोललं जातं.परंतु या दोघांनी कधीही जाहीरपणे आपल्या नात्याचा खुलासा केला नव्हता. परंतु ब्रेकअप नंतर या दोघांमधील वाद स्पष्ट दिसून आला आहे. सध्या कार्तिक आर्यनचं नाव अभिनेत्री क्रिती सेननसोबत जोडलं जात आहे. या दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी बरीच पसंत केली जाते. त्यामुळे या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे.