दरम्यान काही दिवसांपूर्वीच कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून (California Legislature Assembly) सुशांत सिंह राजपूतचा खास सन्मान देखील करण्यात आला.
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने हा पुरस्कार त्याच्या वतीने घेतला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. हे वाचा - ब्योमकेश बक्शी ते दिल बेचारा; फिल्मी प्रवासातील दमदार भूमिकांसह सुशांतचे हटके लुक्स सुशांत सिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर त्याने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये 'काय पो छे!' ही त्याची पहिली फिल्म होती. त्यानंतर तो 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी', 'एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी', 'सोन चिरैया', 'छिछोरे', 'दिल बेचारा' फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसला. दिल बेचारा हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. हे वाचा - कोण आहे सिद्धार्थ पिठानी? जो सुशांत मृत्यू प्रकरणात बनू इच्छितो माफीचा साक्षीदार 14 जून, 2020 ला सुशांतचा मृत्यू झाला. मुंबईतील वांद्र्यातील राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत तो सापडला. याप्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत. सुशांतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावले आहेत. दरम्यान सुशांतचा मित्र आणि त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठानी माफीचा साक्षीदार होऊ इच्छितो आहे. त्याच्याकडून या प्रकरणात अनेक महत्त्वपूर्ण खुलासे होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput