जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोट्यावधी फी घेतो हा चिमुकला, बॉलिवूडच्या स्वप्नसुंदरीसोबत बांधलीय लग्नगाठ

कोट्यावधी फी घेतो हा चिमुकला, बॉलिवूडच्या स्वप्नसुंदरीसोबत बांधलीय लग्नगाठ

कोट्यावधी फी घेतो हा चिमुकला, बॉलिवूडच्या स्वप्नसुंदरीसोबत बांधलीय लग्नगाठ

कोट्यावधी फी घेतो हा चिमुकला, बॉलिवूडच्या स्वप्नसुंदरीसोबत बांधलीय लग्नगाठ

सध्या सोशल मीडियावर एका स्टारचा फोटो व्हायरल होत आहे, जो ओळखणे खरोखरच सोपी गोष्ट नाही. पण या फोटोत दिसणाऱ्या खट्याळ मुलाला तुम्ही ओळखता का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 मे- सोशल मीडियावर व्हायरल होणारे सेलेब्सचे बालपणीचे फोटो आता कोणासाठी नवीन राहिलेले नाहीत. पण आजही चाहते सेलेब्सचे असे बालपणीचे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर भरभरून कमेंट करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका स्टारचा फोटो व्हायरल होत आहे, जो ओळखणे खरोखरच सोपी गोष्ट नाही. पण या फोटोत दिसणाऱ्या खट्याळ मुलाला तुम्ही ओळखता का? फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याची खास गोष्ट म्हणजे या मुलाने स्वत:च्या अटीवर आयुष्य जगला आहे. गेल्या काही काळापासून या मुलाला बॉक्स ऑफिसवर काही खास अशी कमाल दाखवता आलेली नाही. पण एक वेळ अशी होती जेव्हा या मुलांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याचे सिनेमे कोट्यवधींचा बिझनेस करायचे. हा मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे आणि आता आपण कोणाबद्दल बोलत आहोत हे देखील तुम्हाला समजले असेल. होय, आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा मोस्ट हँडसम हंक रणवीर सिंग, जो आज आपल्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. रणवीर नेहमीच त्याच्या अतरंगी स्टाईलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. कधीकधी तो कपड्यावरून ट्रोल देखील होतो. वाचा- प्राजक्ताने सोडलं ‘शिवपुत्र संभाजी’; आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार येसूबाई अशी सुरू झाली लव्हस्टोरी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आहे. रामलीला हा चित्रपट करताना दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केलं. रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये त्याच्या चित्रपटांसाठी तसेच त्याच्या फॅशनेबल ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो. बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारख्या चित्रपटांमध्ये रणवीर सिंगने आपल्या अभिनयाची कसब दाखवली आहे. आजही रणवील त्याच्या मस्त स्टाईल, अभिनय आणि एनर्जीमुळे चाहत्यांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

रणवीर सिंगचे आगामी प्रोजेक्ट मागच्या काही काळापासून रणवीर सिंगचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर म्हणावी अशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर यावर्षी तो रॉकी रानी की प्रेमकहानी या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. याशिवाय तो बैजू बावरा या चित्रपटातही दिसणार आहे. तसेच रणवीर सिंगला डॉन 3 सारखा मोठा चित्रपट मिळाला आहे. याशिवाय रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल 5’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात