Home /News /entertainment /

जान्हवीला हिरॉइन नाही तर 'नवराई' झालेलं बघायची श्रीदेवींची होती इच्छा; दोन्ही गोष्टी राहिल्या अपूर्ण

जान्हवीला हिरॉइन नाही तर 'नवराई' झालेलं बघायची श्रीदेवींची होती इच्छा; दोन्ही गोष्टी राहिल्या अपूर्ण

जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor Debut Film Dhadak) डेब्यू सिनेमा धडक प्रदर्शित होण्यापूर्वीच सर्वांच्या लाडक्या चांदनीने जगाला अलविदा केले होते.

  मुंबई, 11 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री 'श्रीदेवी' यांचे लाखो चाहते आजही आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलीला (Sridevi and Janhvi Kapoor) हे चाहते भरभरून प्रेम देत आहेत. श्रीदेवी आणि त्यांच्या दोन्ही मुलींचं बाँडिंगही खास होतं. श्रीदेवी देखील नेहमी सांगायच्या की त्या कितीही मोठ्या झाल्या तरी माझ्यासाठी त्या छोट्या (Janhvi Kapoor and Khushi Kapoor) मुलीच राहतील. बॉलिवूडमध्ये एक ट्रेंड आहे की शक्यतो एखाद्या अभिनेता-अभिनेत्याची मुलगी अभिनय क्षेत्रातच करिअर करते. पण श्रीदेवींना हे नको होते. जान्हवीने हिरॉइन बनावं असं श्रीदेवी यांची अजिबात इच्छा नव्हती. त्यांना जान्हवीला नवरी झालेलं बघायचं होतं, त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. त्यांना जान्हवीचा पहिला सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर पाहता आला नाही, कारण जान्हवी कपूरच्या पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच श्रीदेवी (Sridevi Death) यांचा मृत्यू झाला होता. जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor Debut Film Dhadak) डेब्यू सिनेमा धडक प्रदर्शित होण्यापूर्वीच सर्वांच्या लाडक्या चांदनीने जगाला अलविदा केले होते. 2017 मध्ये श्रीदेवी यांनी एक मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी जान्हवी कपूरच्या फिल्मी करिअर आणि लग्नाबाबत त्यांचं मत काय आहे याबाबत भाष्य केलं होतं. हे वाचा-'तुला 20 कोटी देते पण...' कार्तिक आर्यनकडे चाहतीने केली अशी विचित्र मागणी श्रीदेवी यांना जान्हवीला नवराई झालेलं बघायचं होतं 2017 मध्ये श्रीदेवी यांचा 'मॉम' सिनेमा आला होता. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्यांनी त्या म्हणाल्या होत्या की 'जान्हवीला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं आहे पण मी कधी तिला याबाबत पसंती दाखवली नाही. मी असं नाही म्हणत की इंडस्ट्री खराब आहे, मी स्वत:च यातून घडली आहे, पण मी एक आई म्हणून विचार करते.' त्या पुढे म्हणाल्या की, खरं बोलायचं तर चित्रपटात अभिनयापेक्षा मला तिला लग्न केलेलं बघायला आवडेल.
  अभिनेत्री पुढे असं देखील म्हणाली होती की, पण जान्हवीच्या आनंदातच आमचा आनंद आहे. मला तिचा आनंद आधी बघायचा आहे. मला तिचा नेहमीच अभिमान असेल, असंही त्या म्हणाल्या होत्या. श्रीदेवींनी यावेळी असं सांगितलं की, बोनी जी आणि मी तिच्या करिअरसबंधातील सर्व अपडेटबाबत जागरुक आहोत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood actress, Janhavi kapoor, Janhvi kapoor, Sridevi

  पुढील बातम्या