मुंबई, 11 मार्च- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या तरुणाईच्या गळयातील ताईत बनला आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्याने फारच कमी वेळेत स्वतःला सिद्ध केलं आहे. हा अभिनेता नेमहीच आपल्या हटके अंदाजात आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याचे चाहतेही त्याला भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकतंच एका चाहतीने अभिनेत्याजवळ एक विचित्र मागणी केली होती. परंतु अभिनेत्याने नेहमीसारख्या मजेशीर अंदाजात उत्तर देत सर्वांनाच चकित केलं आहे. अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘लुडो’ फेम बालकलाकार इनायत वर्मासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकली इनायत कार्तिकच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘धमाका’ चित्रपटातील त्याचाच डायलॉग म्हणत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांसोबतच कार्तिकच्या कलाकार मित्रांनादेखील खूप पसंत पडत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरलदेखील होत आहे.
कार्तिकने काल हा व्हिडीओ शेअर केला होता. काही वेळेतच या व्हिडिओला 13 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय चाहते आणि कलाकार विविध कमेंट्स करून या दोघांवर करत आहेत. दरम्यान कार्तिकच्या एका चाहतीने अशी काही कमेंट केली की सर्वांचंच लक्ष तिच्याकडे गेलं. इतकंच नव्हे तर अभित्यानेसुद्धा तिच्या कमेंटवर उत्तर दिलं आहे. कार्तिकने शेअर केलेल्या व्हिडीओवर एका चाहतीने कमेंट करत चक्क अभिनेत्याला लग्नासाठी मागणीच घातली आहे. त्या चाहतीने अभिनेत्याला म्हटलं, ‘तुम्हाला 20 कोटी देते माझ्याशी लग्न करा’ चाहतीच्या या अजब मागणीला आपल्या खास अंदाजात उत्तर देत अभिनेत्यानेसुद्धा म्हटलं, ‘लग्नाची बोलणी कधी करायची?’ कार्तिकच्या या मजेशीर उत्तरावर इतर लोकसुद्धा आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (हे वाचा: VIDEO: ‘तुला हिंदी येते का?’ पापाराझीच्या या प्रश्नावर पाहा काय म्हणाली समंथा ) कार्तिक आर्यन तरुण पिढीचा फारच आवडता अभिनेता बनला आहे. त्याचे चाहते त्याच्यासाठी विविध गोष्टी करताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने अभिनेत्याचा टॅटू काढून घेतला होता. तर काही चाहत्या अभिनेत्याच्या घराबाहेर थांबून मोठमोठ्याने त्याचं नाव घेत होत्या. कार्तिक नेहमीच आपल्या अशा अतरंगी चाहत्यांना भेटत असतो. कार्तिक आर्यन लवकरच ‘शहजादा’मध्ये दिसणार आहे. रोहित धवन दिग्दर्शित हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शहजादामध्ये मनीषा कोईराला, परेश रावल, रोहित बोस रॉय आणि अंकुर राठी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.