• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • DDLJ: 'राज-सिमरन'च्या केमिस्ट्रीची 26 वर्षे पूर्ण! शाहरुख नव्हे तर सैफला मिळाली होती ऑफर

DDLJ: 'राज-सिमरन'च्या केमिस्ट्रीची 26 वर्षे पूर्ण! शाहरुख नव्हे तर सैफला मिळाली होती ऑफर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने अनेक फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. चित्रपटाच्या यशाने शाहरुखच्या कारकिर्दीला चार चाँद लावले होते

 • Share this:
  मुंबई,20ऑक्टोबर- शाहरुख खान (Shahrukh Khan)आणि काजोल (Kajol) स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'(Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपट प्रदर्शित होऊन आज तब्बल 26 वर्षे झाली आहेत. आदित्य चोप्राच्या 20 ऑक्टोबर 1995 रोजी रिलीज झालेल्या DDLJ चित्रपटाने शाहरुखला रोमान्सचा बादशाह बनवलं होतं. राज आणि सिमरनची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख आणि काजोलने रुपेरी पडद्यावर अशी जादू निर्माण केली होती, जी आजही सिनेप्रेमींवर कायम आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने आपल्या नावावर अनेक फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. चित्रपटाच्या यशाने शाहरुखच्या कारकिर्दीला चार चाँद लावले होते. पण शाहरुखच्या आधी सैफ अली खानला राजच्या भूमिकेसाठी ऑफर मिळाली होती. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटातील मुख्य कलाकारांसह सर्वच पात्र प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, चित्रपट बनवताना कोणालाही वाटले नव्हते की, हा चित्रपट आयकॉनिक चित्रपट बनेल. मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा यश चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' बनवण्याचा विचार केला होता, तेव्हा त्यांनी सैफ अली खानला मुख्य अभिनेता म्हणून घेण्याचा विचार केला होता, कारण त्यांना वाटले की सैफ इंडो अमेरिकन अफेअरच्या या कथेत फिट होईल, पण सैफने काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. आणि त्यांनतर शाहरुख खानला हा चित्रपट मिळाला होता. (हे वाचा:DDLJ मध्ये शाहरुखने घातलेलं ते जॅकेट होतं 'या' अभिनेत्याचं – News18 ... ) थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' च्या प्रत्येक दृश्याला आणि संवादांना दाद दिली होती. अमरीश पुरी चित्रपटात आपली मुलगी सिमरन अर्थातच काजोलला सांगतात की 'जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी'. हा डायलॉग फारच लोकप्रिय झाला होता. सोबतच शाहरुखचा रेल्वे स्टेशनवरचा 'पलट' संवाद इतका हिट झाला की मुले अनेकदा मुलींशी असं बोलल्याचं ऐकण्यात आलं होतं. आणि हे डायलॉग आजही म्हटले जातात. (हे वाचा:DDLJ साठी शाहरुखला नव्हे, तर चक्क 'या'हॉलिवूड अभिनेत्याला होती ... ) चित्रपटाची सर्व गाणी इतकी मेलोडियस होती कि आजही लोकांनानाचण्यास भाग पाडतात. 'मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना' शिवाय मुलीच्या लग्नातील मेहंदीचा सोहळा अपूर्ण वाटत असे. जतीन-ललितचे संगीत आणि आनंद बक्षी यांच्या गीतांना लता मंगेशकर, आशा भोसले, उदित नारायण, कुमार सानू आणि अमिताभ भट्टाचार्य यांचा आवाज मिळाला होता. हि गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात.
  Published by:Aiman Desai
  First published: