मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO:देवीच्या दर्शनासाठी आलेल्या काजोल आणि तनिषामध्ये लागलं भांडण; आईला करावी लागली मध्यस्थी

VIDEO:देवीच्या दर्शनासाठी आलेल्या काजोल आणि तनिषामध्ये लागलं भांडण; आईला करावी लागली मध्यस्थी

अभिनेत्री काजोल ही आई दुर्गामातेची मोठी भक्त आहे. काजोल प्रत्येक नवरात्रीला दुर्गामातेचं दर्शन घेते. ती संपूर्ण कुटुंबासोबत मातेच्या पंडालमध्ये दिसून येते.

अभिनेत्री काजोल ही आई दुर्गामातेची मोठी भक्त आहे. काजोल प्रत्येक नवरात्रीला दुर्गामातेचं दर्शन घेते. ती संपूर्ण कुटुंबासोबत मातेच्या पंडालमध्ये दिसून येते.

अभिनेत्री काजोल ही आई दुर्गामातेची मोठी भक्त आहे. काजोल प्रत्येक नवरात्रीला दुर्गामातेचं दर्शन घेते. ती संपूर्ण कुटुंबासोबत मातेच्या पंडालमध्ये दिसून येते.

मुंबई,20ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेत्री काजोल(Kajol) आपल्या हटके अंदाजाने नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचा लूक असो अभिनय असो किंवा स्वभाव चाहत्यांना तिचा सर्वच अंदाज भावतो. नेहमीच हसतमुख असणारी काजोल नुकताच आपल्या बहिणीशी(Tanisha Mukharjee) सार्वजनिक ठिकाणी चक्क भांडत असल्याचं दिसली. इतकंच नव्हे तर या दोघींच्या मध्ये येऊन आई तनुजाला त्यांना शांत करावं लागलं. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल(Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

नवरात्रोत्सव-

अभिनेत्री काजोल ही आई दुर्गामातेची मोठी भक्त आहे. काजोल प्रत्येक नवरात्रीला दुर्गामातेचं दर्शन घेते. ती संपूर्ण कुटुंबासोबत मातेच्या पंडालमध्ये दिसून येते. प्रत्येक नवरात्रीमध्ये काजोल आपल्या ट्रॅडिशनल लूकए सर्वांचं लक्ष वेधून घेत असते, ती बऱ्याचवेळा बहीण राणी मुखर्जी, तनिषासोबत नववरात्रीचा आनंद घेताना दिसून येते. यावेळी काजोल प्रामुख्याने साडी परिधान करते आणि ती साडी नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरते. यावेळीही काजोलच्या साडी लूकचित्र चर्चा झालीच. मात्र अजून एका कारणाने काजोल चर्चेत आली आहे.

नुकताच बॉलिवूड गॉसीप हबने आपल्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा वव्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारणही तसंच आहे. या व्हिडीओमध्ये काजोल बहीण तनिषाशी चक्क भांडताना दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी या बहिणीची हि खटपट सर्वांच्या नजरेत आली आहे. या व्हिडीओमध्ये काजोल तनिषाला काहीतरी सांगत असते. मात्र या दोघींमध्ये एकमत होताना दिसत नाही, त्यामुळे काजोल तनिषाला शटअप म्हणते. यावर तनिषाही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते.परंतु तोपर्यंत आई तनुजा येऊन मध्यस्थी करते आणि तनिषाला गप्प बसवते. नंतर काजोललाही गप्प करते. मात्र यावेळी तनिषाच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते अर्थातच हे भांडण बहिणीमधील मजेशीर 'तू तू माई मै'असल्याचंच दिसून येतं. नंतर या दोघी आईसोबत येऊन कॅमेराला पोझ देताना दिसतात.

(हे वाचा:VIDEO:वडिलांच्या मास्क उतरवण्यावर भडकली जान्हवी कपूर; पापाराझींनाही फटकारलं)

काजोल दरवर्षी नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करते.यावर्षीही ती मोठ्या उत्सहात दिसून आली. तिने एका व्हिडीओमध्ये चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, चाहत्यांनीही कमेंट्स करत तिला शुभेच्छ दिल्या होत्या.यावेळी काजोलने ब्ल्यू कलरची लायनिंग प्रिंटेड साडी परिधान केली होती. तिचा हा ट्रॅडिशनल लूक सर्वांचं खूप पसंत पडला होता. तिच्या नवरात्री लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चासुद्धा झाली होती.तर बहीण तनिषाही सुंदर अशा साडीमध्ये दिसून आली. या दोघी बहिणी आपल्या आईसोबत दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment