मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shaan Mukherji B'day: 13 व्या वर्षीच वडिलांचं निधन, घर चालवण्यासाठी शानला करावं लागलं होतं 'हे' काम

Shaan Mukherji B'day: 13 व्या वर्षीच वडिलांचं निधन, घर चालवण्यासाठी शानला करावं लागलं होतं 'हे' काम

singer Shaan Mukherji

singer Shaan Mukherji

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट गाण्यांना आपला आवाज देणारे पार्श्वगायक शंतनू मुखर्जी उर्फ ​​शान यांचा आज वाढदिवस आहे. शान आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 30 सप्टेंबर : बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक हिट गाण्यांना आपला आवाज देणारे पार्श्वगायक शंतनू मुखर्जी उर्फ ​​शान यांचा आज वाढदिवस आहे. शान आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे आज शानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडमधील आघाडींच्या गायकांमध्ये शानचं नाव येतं. त्याच्या वाढदिवशी त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

शानचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. शानला संगीताचा वारसा मिळाला आहे. शानचे आजोबा जहर मुखर्जी हे सुप्रसिद्ध गीतकार होते आणि वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते. वयाच्या 13 व्या वर्षी शानच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं. शानने लहान वयातच जाहिरात चित्रपटांसाठी जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटात पहिल्यांदा गायलं. तेव्हापासून शानची लोकप्रियतचा दिवसेंदिवस वाढतंच आहे.

शानने त्याची बहीण सागरिकासोबत पहिल्यांदा एका म्युझिक कंपनीसाठी गाणी गायली. आरडी बर्मन यांचे 'रूप तेरा मस्ताना' गाणे रिमिक्स गायले होते जे लोकांना खूप आवडले होते. बहिण भावाचा हा अल्बम हिट झाला होता.

शानने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पॉप, जॅझ, देशभक्ती, रोमँटिक, हिप हॉप, रॉक अशी सर्व प्रकारची गाणी त्याने गायली आहेत. शानच्या आवाजात एक नाही तर मनाला स्पर्श करणारी शेकडो गाणी आहेत, जसे की 'दिल चाहता है' चित्रपटातील 'वो लडकी है कहाँ', 'प्यार में कभी कभी', 'मुसु मुसु हासी', 'कुछ तो हुआ है', 'जब से तेरे नैना' आणि 'फना' या चित्रपटातील 'चांद शिफारस'. या गाण्यांनी शानला यशाच्या उंच शिखरावर नेऊन पोहचवलं.

शानने आपल्या करिअरमध्ये 'सा रे ग म पा', 'सा रे ग म प लि'ल चॅम्प', 'स्टार व्हॉईस ऑफ इंडिया' आणि 'स्टार व्हॉईस ऑफ इंडिया 2' सारखे शो देखील होस्ट केले आहेत. यामधेही त्याची चांगलीच लोकप्रियता पहायला मिळाली.

First published:

Tags: Birthday celebration, Bollywood, Playback singer, Singer