Home /News /entertainment /

VIDEO : गरीबांना मदत करायला गेलेल्या Neha Kakkar सोबत घडला भयंकर प्रकार; कॅमेऱ्यात कैद झालं ते दृश्य

VIDEO : गरीबांना मदत करायला गेलेल्या Neha Kakkar सोबत घडला भयंकर प्रकार; कॅमेऱ्यात कैद झालं ते दृश्य

नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत असं काही झालं ज्यामुले नेहा घाबरली.

  मुंबई, 25 जानेवारी - नेहा कक्कर (Neha Kakkar) बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. एकेकाळी नेहा माताच्या चौकीवर गात असे. वया चौथ्या वर्षी नेहाने भाऊ सोनू (Sonu Kakkar) कक्करसोबत गायला सुरूवात केली. आता नेहा बॉलिवूडमधील एक मोठं (Neha Kakkar Top Singers Of Bollywood) नाव आहे. स्वताच्या आवाजाच्या जीवावर तिनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असं असल तरी ता जुने दिवस विसलेली नाही. आजही ती गरिबांना मदत करताना दिसते. मात्र यावेळी तिला मदत करण जरा चांगलच महागात पडलं आहे. 500-500 च्या नोटा वाटताना दिसली नेहा कक्कर नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी तिनं लोकांना कारमधूनच 500-500 च्या नोटा वाटायला सुरूवात केली. विशेष म्हणजे तिनं जसे पैसे वाटायला सुरूवात केली तशी बघता बघता कारजवळ गर्दी जमा झाली. पैसे घेण्यासाठी झुंबड उडाली. यानंतर काहींनी पैसे घेण्यासाठी हात पुढे घेतले यावेळी काहीशी झपटाझपटी झाली. हा सगळा गोंधळ पाहून नेहा घाबरली कारमध्ये मागे सरकली व कारची काच बंद करून तिथून निघून गेली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा-कृष्णासाठी रायाचं 'मन झालं बाजींद'! दोघांचे रोमँटिक Photos Viral नटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट नेहा कमेंटचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. काहींने तिचं कौतुक केलं आहे तर कहींने याला रिस्की म्हटलं आहे. एकाने म्हटलं आहे की, भावा जर कोण अशा पाचशेच्या नोटा वाटणार असेल तर लोक थोडीच रांगेत उभा राहून घेतील. एकाने तर यावर चिंता व्यक्त करत म्हटलं आहे की, हे खूपच रिस्की आहे. सेलेब्सनी असं केलं नाही पाहिजे कारण यातुन इजा होण्याची शक्यता आहे. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, दिलं तरी प्राब्लेम आणि नाही दिलं तरीही...
  रश्मिका मंदानाच्या व्हिडिओची झाली आठवण नेहाचा हा व्हिडिओ पाहून पुष्पा स्टार रश्मिका मंदानाची आठवण नेटकऱ्यांना झाली आहे . एकाने म्हटलं आहे की, असाच एक व्हिडिओ रश्मिकाचा समोर आला होता. मात्र तिनं पैसे वाटले नव्हते. तिला मात्र तिनं पैसे वाटले नाही म्हणून ट्रोल केले होते. यावरून एक लक्षात येते की, लोक दुसऱ्यांना सल्ला देण्यात धन्यता मानतात. मात्र स्वता मात्र काहीच करताना दिसत नाहीत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Neha kakkar

  पुढील बातम्या