नेहा कक्करला होता हा गंभीर आजार, अँझायटीशी देखील केला सामना
नेहा कक्करला होता हा गंभीर आजार, अँझायटीशी देखील केला सामना
एकेकाळी नेहा अशा आजाराने ग्रासली होती की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेहा कक्करने गेल्यावर्षी केलेल्या एका खुलाशामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता.
मुंबई, 09 मे: गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar Latest News) हिचा आवाज आज घराघरात पोहोचला आहे. नेहा आणि हिट गाणं हे जणू समीकरणंच बनलं आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी नेहाचा प्रवास सोपा नव्हता. तिने आर्थिक अडचणींसह आरोग्यविषयक अडचणींचाही सामना केला आहे. एकेकाळी नेहा अशा आजाराने ग्रासली होती की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेहा कक्करने गेल्यावर्षी केलेल्या एका खुलाशामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता.
नेहा कक्करने अशी माहिती दिली होती की ती अँझायटीचा (Neha Kakkar faced Anxiety) त्रास आहे, याशिवाय तिला थायरॉइड देखील होती. सध्या हे दोन्ही आजार सामान्य झाले आहेत. पण त्याचे परिणाम फार गंभीर आहेत. नेहा कक्करने देखील या आजारांचा सामना केली आहे. मात्र या समस्यांना तोंड देत नेहाने आज संगीत क्षेत्रात यश संपादन केलं आहे.
हे वाचा-Aamir Khan ने पूर्वपत्नी रीनासह साजरा केला लेकीचा वाढदिवस, आयराचे BF सोबतचेही Photo Viralइन्स्टाग्रामवर वाढले आहे नेहाचे फॅन फॉलोइंग
नेहाचे फॅन फॉलोइंग सध्या सोशल मीडियावर देखील वाढताना दिसत आहे. नेहाने स्वत: तिचा पती रोहनप्रीतसह फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली होती. या फोटोमध्ये नेहा-रोहनच्या मागे एक मंदिर देखील दिसत आहे.
तिने अशी कॅप्शन दिली आहे. 'ओह माय गॉड, आताच पाहिले की माझी 7 कोटी (7,0000000) लोकांची आर्मी आहे. प्रेमळ लोकं आणि उत्तम कुटुंब. इन्स्टाग्रामवर 69+ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि लवकरच 70 होतील. मी नक्कीच देवाचे आवडते मुल आहे. सर्वांना प्रेम आणि मनापासून धन्यवाद'.
नेहाचे नवीन गाणे प्रदर्शित
गायिका नेहा कक्करचे 'ला ला ला' नावाचे नवीन गाणे अलीकडेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात तिचा पती रोहनप्रीत देखील आहे. याआधी देखील परफॉरमन्समधून दोघांची केमिस्ट्री बघायला मिळाली आहे. आता पुन्हा एकदा अनेकांची ही फेव्हरिट जोडी रोमॅन्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या गाण्यावर नेहाचे चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.