मुंबई, ९ सप्टेंबर- गायिका नेहा कक्कड हिने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेबी बम्पसह फोटो शेअर केला होता. यावेळी ती प्रेग्नंट (Neha Kakkar Baby bump) असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. विशेष म्हणजे तेव्हा तिच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते. पण नंतर हा फोटो म्हणजे तिच्या एका गाण्याचा (Neha Kakkar song) भाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर आता पुन्हा नेहा कक्कड प्रेग्नंट (Neha Kakkar Pregnancy) असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच, आता ती बिग बॉस या रिअलिटी (Neha Kakkar Bigg Boss) शोमध्ये येणार आहे. रविवारच्या एपिसोडमध्ये ती आपल्या प्रेग्नन्सीबाबत मोठा खुलासा कऱणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिग बॉस या रिअलिटी शोचा नवा सीझन ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss) हा सध्या सुरू आहे. नावाप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो प्रदर्शित होतो आहे. रविवारी याचा ‘संडे का वार’ (Bigg Boss Sunday ka War) हा विशेष एपिसोड प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये गायिका नेहा कक्कड तिचा भाऊ टोनी कक्कडसोबत (Tony Kakkar) दिसणार आहे. या एपिसोडमध्येच नेहा एक मोठा खुलासा करणार असल्याची माहिती स्पॉटबॉय (SpotboyE) या वेबसाईटने दिली आहे. नेहाच्या प्रेग्नन्सीबाबत आधीपासूनच (Neha Kakkar Pregnancy announcement) चर्चा सुरू असल्यामुळे हा खुलासाही याबाबत असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(हे वाच:रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी...' माधुरीसोबत जॅकलिन आणि यामीची ठसकेबाज )
यापूर्वी आपल्या लग्नानंतर केवळ दोन महिन्यांनीच बेबी बम्प असलेला फोटो शेअर करुन नेहाने सगळ्यांना धक्का दिला होता. मात्र, तेव्हा हा फोटो तिच्या ‘ख्याल राख्या कर’ गाण्याचा भाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. नेहाच्या लग्नावेळीही असंच काही झालं होतं. लग्नाआधी नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत (Neha Kakkar and Rohanpreet marriage) यांचं एक गाणं रिलीज झालं होतं. त्यानंतर लगेचच त्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली होती. तेव्हा सर्वांना वाटलं होतं, की हा प्रमोशनचा भाग आहे. मात्र, त्यांनी खरोखरच लग्न केल्याचं समजताच चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा नेहाच्या प्रेग्नन्सीबाबत (Neha Kakkar pregnancy) चर्चा सुरू आहेत. मात्र, बिग बॉसमध्ये ती याबाबत खुलासा करेल की नाही हे तर रविवारचा एपिसोड रिलीज झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
(हे वाचा:फिल्मफेअरसाठी सोनाक्षीचं नवं फोटोशूट; पाहा अभिनेत्रीचा किलर LOOK)
नेहा, टोनी आणि रॅपर हनी सिंग यांचं ‘कांटा लगा’ (Honey Singh Kanta Laga) हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नेहा आणि हनीचे चाहते या गाण्याची वाट पाहत होते. रिलीज झाल्यानंतर या गाण्याला संमिश्र प्रतिक्रिया (Kanta Laga song reactions) मिळताना दिसून येत आहेत. याच गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहा आणि टोनी बिग बॉसमध्ये येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss OTT, Entertainment, Neha kakkar