मुंबई, 16 जून- तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली सिंगर जोडी(Singer) म्हणजे अरमान मलिक(Arman Malik) आणि अमाल मलिक(Amaal Malik) होय. या दोघांनीही आपल्या आवाजाने आणि संगीताने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. या दोघांनीही बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. या जोडीपैकी एक म्हणजेच अमाल मलिक आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील एक भन्नाट किस्सा.
अमाल आणि अरमान आपले वडील डब्बू मलिकसोबत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक जबरदस्त किस्से शेयर केले. यावेळी अमालने आपल्या आयुष्यातील एक असा किस्सा सांगितला होता, ते ऐकून सर्वांनाचं आश्चर्य वाटलं होतं. यावेळी अमालने म्हटलं होतं, ‘त्याला संगीत निर्मिती करण्यासाठी एकांत हवा असतो. त्या गाण्यामध्ये जे इमोशन्स आहेत, त्याला त्यामध्येचं राहायला आवडतं. त्यामुळे संगीत निर्मितीमध्ये पूर्णत्व येतं. आणि त्या गाण्याचे भाव त्यामध्ये पूर्णपणे उतरतात. (हे वाचा: कबीर सिंगची प्रीती पडली प्रेमात? ‘त्या’ कमेंटने चाहत्यांच्या प्रश्नांना उधाण ) आणि अशाप्रकारे अमाल एका गाण्यासाठी संगीत तयार करत होता. आणि त्या गाण्याची थीम ब्रेकअपवर आधारित होती. त्यामुळे ते इमोशन्स, ते दुख त्यामध्ये पुरेपूर येणं आवश्यक होतं. आणि म्हणूनच अमालने चक्क आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केलं होतं’. अमालकडून हा किस्सा ऐकून सगळेच अवाक् झाले होते. (हे वाचा: दिशा पाटनीचा Before & After लुक होतोय VIRAL; बदल पाहून व्हाल अवाक् ) अमाल मलिक हा प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार अनु मलिक यांचा भाचा आहे. त्यामुळे बालपणपासूनचं त्यांच्या घरी संगीतमय वातावरण होतं. अरमानने सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटापासून या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याने खुबसूरत, हिरो, रॉय, एक पहेली लीला, सनम रे, एयरलिफ्ट अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.