मुंबई 15 जून : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) निरनिरळ्या कारणांसाठी चर्चेत राहते. ‘फुग्ले’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कियारा आता लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. तर ‘एम एस धोनी’ आणि ‘कबीर सिंग’ या चित्रपटांनी तिला बॉलिवूमध्ये मोठी ओळख निर्माण करून दिली होती. गेले अनेक दिवस कियाराच्या अफेअरची चर्चा आहे. पण कियाराच्या एका कमेंटने साऱ्यांचचं लक्ष वेधलं आहे. गेले अनेक दिवस कियारा आणि बॉलिवूडचा हॅन्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांच्या अफेअरची चर्चा आहे. तर अनेकदा ते एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही. पण आता कियाराच्या कमेंटने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सिद्धार्थने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या सनकिस (sunkissed) फोटोवर त्याने ‘चेसिंग द सन’ असं कॅप्शन लिहिलं होतं. त्यावर कियाराने कमेंट करत. ‘फोटोग्राफरही खूप सुंदर आहे’ असं लिहिलं. कियाराच्या या कमेंटवर सिद्धार्थने काहीच रिप्लाय दिला नसला तरी त्यांच्या चाहत्यांनी मात्र अनेक प्रश्न तसेच रिप्लाय दिले आहेत.
यामुळे कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या नात्याची कबूली तर देत नाहीत ना असा प्रश्नही अनेकांना पडला. दरम्यान सिद्धार्थ याआधी अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) डेट करत होता. मात्र काही वर्षानंतर त्यांच ब्रेकअप झालं. व आलिया अभिनेता रणबिर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली.
अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटककियारा आणि सिद्धार्थ ‘शेरशाह’ (Shershah) या चित्रपटासाठीही एकत्र काम करत आहेत. चित्रपटात सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय सिद्धार्थ ‘थँक गॉड’, ‘मिशन मजनू’ या चित्रपटांत झळकणार आहे.