मुंबई, 27 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून कसून चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी समोर आलेल्या ड्रग कनेक्शनसंदर्भात ही चौकशी करण्यात आली. श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर असे मान्य केले आहे की तिने सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिले आहे. या दरम्यान अशी माहिती मिळते आहे की, श्रद्धाचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) सुशांतवर बनत असणाऱ्या सिनेमातील एक मुख्य घटक असणार आहेत.
शक्ती कपूर सुशांतवर बनत असलेल्या एका सिनेमामध्ये नार्कोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका निभावताना दिसणार आहेत. 'न्याय- द जस्टिस' या सिनेमामध्ये शक्ती कपूर NCB अंधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत तर सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेत सुधा चंद्रन दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता जुबेर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर श्रेया शुक्ला देखील या सिनेमात दिसणार आहे.
(हे वाचा-'फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली...', श्रद्धा कपूरचा मोठा खुलासा)
न्यूज18 हिंदीने दिलेल्या बातमीनुसार जुबेर खानने अशी माहिती दिली आहे की, या सिनेमाचे कास्टिंग जवळपास पूर्ण झाले आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, अंकिता लोखंडे, कृती सॅनन, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती आणि अभिनेत्याची मॅनेजर दिशा सॅलियन या सर्वांचे कॅरेक्टर दिसणार आहे. बिग बॉस फेम सोमी खान दिशाच्या भूमिकेत दिसणार आहे.
(हे वाचा-मोठी बातमी! ते ड्रग चॅट दीपिकाचेच, अभिनेत्रीने स्वत: दिली कबुली पण...)
दरम्यान एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की, शनिवारी झालेल्या चौकशीत अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे (Chhichhore ) सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली. एनसीबीच्या चौकशीमध्ये श्रद्धा कपूरने अशी माहिती दिली आहे की छिछोरेच्या पार्टीमध्ये ती पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये तिने केवळ डान्स केला होता. तिने अशी माहिती दिली की तिने यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते. शनिवारी दीपिका पादुकोण आणि सारा अली खान यांची देखील दीर्घकाळ चौकशी झाली.