• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राज कुंद्रा केसमध्ये शर्लिन चोप्राचा VIDEO व्हायरल; केला धक्कादायक खुलासा

राज कुंद्रा केसमध्ये शर्लिन चोप्राचा VIDEO व्हायरल; केला धक्कादायक खुलासा

नुकताच शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) आपला एक व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. त्यामध्ये तिने खळबळजनक खुलासे केले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 23 जुलै- अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) पतीला(Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर सर्वांनाचं मोठा धक्का बसला होता. त्यांनतर या केसमध्ये आत्ता अनेक नवनवीन खळबळजनक असे खुलासे होतं आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखीणचं गंभीर होतं आहे. या प्रकरणामध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या पूनम पांडे आणि शर्लीन चोप्रा खुलेपणाने बोलत आहेत. नुकताच शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) आपला एक व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. त्यामध्ये तिने खळबळजनक खुलासे केले आहेत. शर्लिन चोप्राने काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. शर्लिनने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं आहे, ‘राज कुंद्रा प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर सेलच्या टीमला सर्वात प्रथम जबाब देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ती मी होते’. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. पुढे तिनं म्हटलं आहे, ‘अनेक पत्रकार गेली काही दिवस मला राज कुंद्रा प्रकरणावर काही तरी बोल असं म्हणत होतं. मात्र मार्चमध्ये मी सर्वप्रथम माझा जबाब नोंदवला होता. ज्यावेळी मार्चमध्ये तपासाची नोटीस आली होती. तेव्हा मी ना देश सोडून नाही गेले, ना कुठे गायब झाले, ना भूमिगत झाले. या प्रकरणामध्ये बोलण्यासाठी खूप काही आहे. मात्र सध्या यावर बोलणं ठीक नाहीय’. (हे वाचा:  राज कुंद्राविरोधात जवाब दिलेल्या अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी) या प्रकरणानंतर अनेक पत्रकार मला मेसेज, कॉल व्हाट्सअप करून या विषयावर पुढाकार घेऊन काही तरी बोलण्याअसं सांगत होते. मात्र मी आज सर्वांना सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये मुंबई सायबर सेलजवळ जबाब नोंदवनारी पहिली व्यक्ती मीचं होते’. (हे वाचा:राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…) आपल्याला सांगू इच्छितो, की या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत राज कुंद्रासह एकूण 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस मोठ्या सतर्कतेने याचा तपास करत आहेत. आत्तापर्यंत व्हाट्सअप मेसेजसपासून ते अश्लील व्हिडीओपर्यंत अनेक महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: