• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पूनम पांडेने राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; अभिनेत्रीचा हा VIDEO होतोय VIRAL

पूनम पांडेने राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; अभिनेत्रीचा हा VIDEO होतोय VIRAL

सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक केल्यानंतर एकचं खळबळ माजली आहे. त्याच्या अटकेनंतर आत्ता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 20 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि तो इंटरनेटवर रिलीज करण्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि याबाबतीत पोलिसांनी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचंही म्हटलं आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक प्रकरणे आत्ता समोर येत आहेत. नुकताच मॉडेल, अभिनेत्री असणाऱ्या पूनम पांडेनेसुद्धा (Poonam Pandey) राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. पाहूया ती नेमकं काय म्हणाली.
  View this post on Instagram

  A post shared by E24 Bollywood (@e24official)

  सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक केल्यानंतर एकचं खळबळ माजली आहे. त्याच्या अटकेनंतर आत्ता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या पूनम पांडेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ E 24 ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यामध्ये पूनमने म्हटलं आहे, ‘मी या संधीचा फायदा घेत, आज पुन्हा एकदा माझ्या केसला हायलाईट करू इच्छिते. मी 2019 मध्ये राज कुंद्राविरोधात बॉम्बे हायकोर्टात तक्रार दाखल केली होती.  फसवणूक आणि फोटोंचा गैरवापर केल्याचा यामध्ये आरोप केला होता. मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं तिनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे’. (हे वाचा:PHOTOS: एक सर्वसामान्य शॉल विक्रेता राज कुंद्रा कसा बनला अरबपती? ) पूनम पांडेने 2019 मध्ये राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाहवर आपल्या फोटोंचा आणि व्हिडीओचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच आपल्या पेमेंटमध्येही घोटाळा केल्याचा आरोप तिने बॉम्बे हायकोर्टात केला होता. मात्र राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाहने हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र आत्ता राजच्या अटकेनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (हे वाचा:दोषी आढळल्यास शिल्पा शेट्टीच्या पतीला होऊ शकते तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा) सध्या पोलीस पोर्नोग्राफी रकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कसून चौकशी करत आहेत. राज कुंद्राला रात्री अटक केल्यानंतर आज पुन्हा रायन थापी या व्यक्तीला या संदर्भात अटक करण्यात आलं आहे. हा व्यक्ती राज कुंद्राचा जोडीदार असल्याचं म्हटलं जातं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: