मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Model Rape Case: जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील 9 जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप; गुन्हा दाखल

Model Rape Case: जॅकी भगनानीसह सिनेसृष्टीतील 9 जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप; गुन्हा दाखल

Bollywood Model Rape Case: बॉलिवूडची गायिका आणि माजी मॉडेलने हिंदी चित्रपटसृष्टीतील नऊ बड्या कलाकरांविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी (Actor Jackie Bhagnani) आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन (Colston Julian) यांची नावं देखील आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 01 जून: बॉलिवूडची गायिका आणि माजी मॉडेलने (Rape on Bollywood model) हिंदी चित्रपटसृष्टीतील नऊ बड्या कलाकरांविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरची एक प्रत न्यूज18 कडे हाती लागली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी (Actor Jackky Bhagnani)  आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन (Colston Julian) यांची नावं देखील आहेत. मॉडेलने प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनवर बलात्काराचा आरोप लावला आहे. तर जॅकी भगनानी याच्यासह इतर आठ जणांविरुद्ध छळ (Molestation) केल्याचा आरोप लावला आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कलम 376 (N), 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित 28 वर्षीय मॉडेलने असा आरोप केला आहे की, आरोपींनी 2014 ते 2018 या चार वर्षांच्या काळात तिला अनेकवेळा लैंगिक त्रास दिला आहे. अभिनेता जॅकी भगनानी याने वांद्रे येथे मॉडेलचं लैंगिक शोषण केलं आहे. तर निखिल कामत यांनी सांताक्रूझमधील एका हॉटेलमध्ये तिचं शारीरिक शोषण केलं आहे. यासोबतच अन्य सात आरोपींमध्ये टी-सीरीजचे कृष्ण कुमार, टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानचे सह-संस्थापक, अनिर्बान दास ब्लाह, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरज्योत सिंग आणि विष्णू वर्धन इंदुरी यांचीही नावं आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनने माझ्यावर अनेकवेळा बलात्कार केला असल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. मॉडेलच्या मते, अभिनय क्षेत्रात करीयर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. पण चित्रपटांत भूमिका मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी तिचा अनेकदा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पुष्टी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी  केली आहे. परंतु याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा- मुंबईतलं मॉडेल बलात्कार प्रकरण, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं की, मॉडेलच्या तक्रारीनुसार, आम्ही सर्व आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 (N), 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व आरोपींची चौकशी करणार आहोत, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Rape