मुंबई, 30 मे: अंधेरीतील 28 वर्षीय मॉडेलवर झालेल्या बलात्काराप्रकरणी मुंबई पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मी टू प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांवर आरोप झाले असताना आता अंधेरीत राहणाऱ्या 28 वर्षीय मॉडेलने बलात्काराची (Rape And Molestation Case) तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 9 जणांविरोधात ही कारवाई केली आहे. तक्रारीनंतर बांद्रा पोलिसांनी (Bandra police) नऊ जणांविरोधात बलात्कार, विनय़भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा पुत्र आणि अभिनेता, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध छायाचित्रकार, चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे. 2014 ते 2019 या कालावधीत पीडित मॉडेलवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. कोलस्टन ज्युलियन, अनिरबान ब्लाह, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, जॅकी भगनाणी, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णूवर्धान इंदुरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यात कोलस्टन ज्युलियन हा फोटोग्राफर आहे. तर इतर आठ जणांमध्ये एका प्रसिद्ध निर्मात्याचा मुलगा आणि बॉलिवूडमधील टॅलेंट मॅनेजर आणि चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे. वांद्रे पोलिसांनी 26 मे रोजी याप्रकरणी एफआयर दाखल करुन घेतली. हेही वाचा- मोठी बातमी: मेहुल चोक्सीचा डोमिनिकाच्या तुरुंगातला EXCLUSIVE फोटो नेमकं प्रकरण काय? पीडित मॉडेलनं 12 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. यात एका कामाच्या असाइन्मेंट दरम्यान शारीरिक आणि भावनिक अत्याचार झाल्यानं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. लैंगिक छळ आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप करत एका फोटोग्राफरविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिनं पोस्टद्वारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.