Home /News /entertainment /

धर्मेंद्रंना डिस्चार्ज तर या सुपरस्टारच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, हॉस्पिटल बेडवरील फोटो VIRAL; चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण

धर्मेंद्रंना डिस्चार्ज तर या सुपरस्टारच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, हॉस्पिटल बेडवरील फोटो VIRAL; चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीसंदर्भात (Mithun Chakraborty Hospitalized) एक महत्त्वाचे अपडेट समोर येते आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो पाहून त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.

    मुंबई, 2 मे: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीसंदर्भात (Mithun Chakraborty Hospitalized) एक महत्त्वाचे अपडेट समोर येते आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो पाहून त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. फोटोमध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर (Mithun Chakraborty Viral Photo) झोपलेले दिसत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी मिथुन यांचा हा फोटो शेअर करत ते लवकरात लवकर बरे व्हावेत याकरता शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याबाबत महत्त्वाचे हेल्थ अपडेट (Mithun Chakraborty Health Update) दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिमोह चक्रवर्तीने अशी माहिती दिली आहे की, किडनी स्टोनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्हायरल फोटो रुग्णायलातीलच आहे. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक आहे. बंगळुरूच्या हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देखील देण्या आला आहे. ते एकदम फिट अँड फाइन असल्याचीही माहिती मिथुन यांच्या मुलाने दिली आहे. मिमोहने दिलेल्या हेल्थ अपडेटविषयी भास्कर.कॉमच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. हे वाचा-कॅन्सरशी लढा देणारी छवी मित्तल सर्जरीनंतर पोहोचली याठिकाणी, स्वत:लाच दिली शाबासकी! भाजपचे माजी खासदार अनुपम हाजरा यांनी मिथुन चक्रवर्तींचा एक फोटो 30 एप्रिल रोजी शेअर केला होता. ज्यामध्ये मिथुन दा हॉस्पिटलच्या बेडवर पडून आराम करताना दिसत आहेत. अनुपम हाजरा यांच्या पोस्टनंतर मिथुन चक्रवर्तींचे चाहते त्यांना अशाप्रकारे पाहून अस्वस्थ झाले होते. या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत मिथुन चक्रवर्ती बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. धर्मेंद्रंनाही मिळाला डिस्चार्ज दरम्यान बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना देखील मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ते आता पूर्वीपेक्षा बरे आहेत. त्यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत घरी परतल्याची खूशखबर दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mithun chakraborty

    पुढील बातम्या