मुंबई, 29 जून- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर आई होणार असल्याची गोड बातमी
(Alia Bhatt Good News) दिल्यापासून सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ही बातमी समजल्यापासून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता कपूर कुटुंबातील नव्या पाहुण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. आलियाच्या या गोड बातमीनंतर आता 'ड्रामा क्वीन' राखी सावंतही
(Rakhi Sawant) आई होण्यासाठी उत्सुक आहे. नुकतंच राखीने आपली ही इच्छा व्यक्त केली आहे.त्यांनतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राखी सावंत सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री नेहमीच बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. दरम्यान आता राखी सावंतने पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. 'ड्रामा क्वीन'चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने स्वतः पापाराझींसमोर आपली ईच्छा उघड केली आहे.
वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. ज्यामध्ये राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल खानसोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिथे पापाराझींनी त्यांना घेरलं आणि आलियाच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारले. मग राखीने आपली इच्छा व्यक्त करत म्हटलं, 'मी कधी होणार आई'
(हे वाचा: श्वेता तिवारीच्या ऑनस्क्रीन लेकीने घटवलं इतकं वजन; वेट लॉस जर्नी पाहून सर्वच थक्क)
राखी पुढे म्हणते, 'मला आई व्हायचं आहे. लग्नाआधीच गुड न्यूज आली तर काळजी करू नका. मी जेव्हा गुड न्यूज देईन तेव्हा दुसऱ्याच दिवशी माझं लग्न होईल. आजकाल हे असंच चालू आहे, नाही का? पण असं करणं हा गुन्हा आहे ना… मी हे करणार नाही, देव मला माफ करणार नाही. मला एवढंच माहीत आहे की जो माझ्या पोटी जन्म घेईल तो मसिहा म्हणून जन्म घेईल. जो या देशाचा तारणहार असेल. खून, गुन्ह्यात अडकलेल्यांना कोण रस्ता दाखवणार. हो ना असं घडू शकतं? कारण मी किती चांगली मुलगी आहे हे तुम्हांला माहीत आहे.असं राखी या व्हिडीओमध्ये सांगत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.