मुंबई, 15 फेब्रुवारी : अभिनेत्री मलायका अरोरा ही अर्जुन आणि तिच्या रिलेशनशीपमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तसच मलायका सोशल मीडियावरही चांगलीच अक्टिव्ह असते. ती स्वत:चे आणि बॉयफ्रेंड अर्जुनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायकाच्या फोटोंना चाहतेही भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. मलायकचे हॉट फोटो, व्हिडिओ, लूक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
नुकतच मलायकाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आणि हे फोटो व्हायरल होण्याचं कारण काही वेगळं आहे. मलायकाने शेअर केलेले हे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाइट मध्ये आहेत. मलाकाने फोटो शेअर करताना ‘#blacknwhiteseries’ असं लिहिलं आहे. या फोटोंकडे बघितल्यावर कळतं की हे फोटो काही वर्षापूर्वीचे आहेत. मात्र तरिही या फोटोंमधील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांना पसंत पडत आहे. चाहते दिलखुलासपणे मलायकाच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
'अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही', तनुश्री दत्ता पुन्हा भडकली
पहिल्या फोटोत मलायका शेतात धावताना दिसत आहे. या फोटोमध्ये मलायकाने घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिला ब्युटी इन ब्लॅक अँड व्हाइट म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तर शेवटच्या फोटोमध्ये ती एकदम स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे. मलायकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे मलायकाचे हे black and white मधील फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
मलायकाच्या बॉयफ्रेंडबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं? अभिनेत्रीनं केला खुलासा
नुकतच मलायकाने लॅक्मे फॅशन विक 2020 मध्ये लाल रंगाचा लेहंगा घालून रँपवर कॅटवॉक केला होता. मलायकाचे रेड ड्रेसमधील ते फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मागच्या काही काळापासून मलायका अरोरा तिच्या अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. हे दोघंही या वर्षात लग्न करण्याची शक्यता आहे.
Bigg Boss 13 : फिनालेच्या काही तास आधीच पैसे घेऊन आसिम रियाजनं सोडला शो?