मोठी बातमी! पाकिस्ताकडून LOCवर मोठ्या प्रमाणात गोळीबार, 6 जवान जखमी

मोठी बातमी! पाकिस्ताकडून LOCवर मोठ्या प्रमाणात गोळीबार, 6 जवान जखमी

पाकिस्तानकडून फेकण्यात आलेला गोळा सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

जम्मू काश्मीर, 03 एप्रिल : जगभरात कोरोनाच्या संकटात असतानाही पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुदंरबनी परिसरात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून याचं चौख उत्तर देण्यात आलं आहे. या चकमकीत 6 जवान जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून फेकण्यात आलेला गोळा सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने अनेक जवान गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 4 जवान आणि 2 बीएसएफचे जवान जखमी झाले आहेत.

First published: April 3, 2020, 2:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या