अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna Birthday) आज 05 एप्रिल रोजी तिचा 26वा वाढदिवस साजरा (Happy Birthday Rashmika Mandanna) करते आहे. अभिनेत्रीने एवढ्या कमी वयात मोठमोठी शिखरं गाठली आहे. अभिनेत्रीचे लाखो फॅन्स दिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. त्यानिमित्त जाणून घेऊया रश्मिकाविषयी खास गोष्टी...
दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कमी वयात लोकप्रिय ठरलेली रश्मिका मुळची कर्नाटकची आहे. तिचा जन्म याठिकाणी विराजपेटमध्ये झाला. तिच्या आई-वडिलांचे नाव सुमन आणि मदन मंदाना आहे
रश्मिका ने M. S. Ramaiah College of Arts, Science and Commerce मधून तिची पदवी घेतली आहे. अभिनयाची कास धरलेल्या रश्मिकाने मानसशास्त्र, इंग्रजी साहित्य आणि पत्रकारितेमध्ये पदवी घेतली आहे
2016 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मिकाची किरिक ही डेब्यू फिल्म होती. कन्नड भाषेतील या सिनेमाने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यावेळी हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड सिनेमा ठरला होता. रश्मिकाला त्यावेळी सर्वोत्कृष्ट पदार्पणचा पुरस्कार देखील मिळाला होता.
रश्मिकाने त्यानंतर चमक आणि अंजनी पूत्र हे दोन कन्नड चित्रपट केले. त्यानंतर पहिल्यांदाच ती विजय देवरकोंडासह गीता गोविंदममध्ये दिसली. महेश बाबूसह रश्मिकाने केलेला सिनेमा सरिलेरू नीकेव्वारु त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा तेलुगू चित्रपट ठरला होता.
रश्मिका आणि विजय यांच्या रिलेशनशिपची चर्चाही होत असते. गीता गोंविदम व्यतिरिक्त या दोघांनी डिअर कॉम्रेड हा सिनेमा देखील एकत्र केला आहे. दरम्यान ही चाहत्यांच्या फेव्हरिट जोडीपैकी एक आहे
रश्मिकाने दिलेल्या या हिट सिनेमांनतर, तिच्या क्यूट स्माइलमुळे आणि एक्सप्रेशन्समुळे अनेकांची क्रश बनली आहे. सोशल मीडियावर, विविध वृतांमध्ये रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणून संबोधलं (National Crush Rashmika Mandanna) म्हणून संबोधलं जातं.
'पुष्पा- द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमातील 'श्रीवल्ली'मुळे ती केवळ दक्षिणेतच नाही, तर देशभरातील घराघरात पोहोचली. या सिनेमानंतर तिच्या करिअरला एक वेगळी झळाळी मिळाली आहे.
26 वर्षांच्या रश्मिकाच्या करिअरचा आलेख चढता असला तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले.
किरिक सिनेमाच्या एका पार्टीमध्ये तिची भेट अभिनेता रक्षित शेट्टी याच्याशी झाली होती. आणि त्यांनी काही महिन्यातच त्यांच्या नात्याबाबत मोठा निर्णय घेतला
दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये साखरपुडा केला. पण हे नात फार काळ टिकलं नाही
आता रश्मिकाचं नाव विजय देवरकोंडासह जोडलं जात आहे. या दोघांच्या लग्नाच्या बातम्याही ऐकायला मिळतात. हे दोघं कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
पुष्पामधून देशभरातून चाहते कमावलेले ही 'श्रीवल्ली' आता बॉलिवूडमध्येही (Rashmika Bollywood Movie) जम बसवण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभ बच्चनसोबत गुड बाय या चित्रपटात झळकणार आहे.
याशिवाय ती रणबीर कपूरसह Animal सिनेमातही दिसणार आहे. रश्मिकाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती.