मुंबई, 12 मे: कंगना रणौत तिच्या ‘धाकड’ (Kangana Ranaut Latest Update) वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. या बॉलिवूडच्या क्वीनने बॉलिवूडमध्येच अनेकांशी पंगा घेतला आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर देश-विदेशातील प्रश्नांवरही ती परखडपणे तिचं मत मांडते. ‘पंगा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी कंगना तिच्या लव्ह लाइफमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. मात्र तिच्या प्रेमाची गोष्ट कधी लग्नापर्यंत पोहोचली नाही. अलीकडेच कंगना रणौतने खुलासा केला आहे की तिच्या लग्नातील अडचण काय आहे, का तिचे लग्न होत (Kangana Ranaut on her Marriage) नाही आहे. यामागे निव्वळ काही अफवा असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे. कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, जो एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये ती जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने काही खुलासा केले आहेत. कंगनाला मिळत नाही आहे परफेक्ट मॅच अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने गंमतीत सांगितले की, अफवा अशा प्रकारे पसरल्या की लोकांनी माझ्याबद्दल त्यांचे मत बनवले आहे आणि आता हेच कारण आहे की मला एकही परफेक्ट मॅच मिळत नाही. सिद्धार्थ कननसह केलेल्या संवादादरम्यान कंगनाला विचारण्यात आले की, ती खऱ्या आयुष्यात तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखे इतकी मजबूत का आहे? हा प्रश्न ऐकून हसत हसत कंगना म्हणाली, ‘तसं नाही आहे. खऱ्या आयुष्यात मी कुणाला मारणार? माझं लग्न होत नाही आहे कारण लोकं माझ्याविषयी अफवा पसरवत आहेत.’ हे वाचा- ‘लँड करा दे’ मीममधील तरुण आठवतोय का? Alia Bhatt सह करतोय शूटिंग; पाहा VIDEO कंगना लग्न का करत नाही? कंगनाच्या लग्नाबाबत तिला असा प्रश्न विचारण्यात आला की, तिच्याबाबत लोकांनी असं मत बनवलं आहे की ती खूप कठोर आहे त्यामुळे तिचं लग्न होत नाही आहे का? याचं उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘हो, कारण माझ्याबद्दल अशी चर्चा आहे की मी मुलांना मारहाण करते’. अर्जुन रामपालने केलं कंगनाचं कौतुक या संपूर्ण मुलाखतीमध्ये ‘धाकड’ सिनेमातील अभिनेता अर्जुन रामपाल देखील होता. त्याने कंगनाचा चांगुलपणा तर सांगितलाच पण अशा अफवा पसरवू नका असेही मजेशीरपणे सांगितले. तो म्हणाला की, ‘कंगनाबद्दल मी एवढेच सांगेन की ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. ती जे काही करते, ते तिच्या भूमिकेसाठी करते, पण खऱ्या आयुष्यात ती तशी नाही. कंगना खऱ्या आयुष्यात खूप गोड, प्रेमळ आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.