मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /#BlackLivesMatter चा मुद्दा आणत गौहर खानने बॉलिवूडकरांना मारला टोमणा

#BlackLivesMatter चा मुद्दा आणत गौहर खानने बॉलिवूडकरांना मारला टोमणा

 'एखाद्या जीवाचं मोल खूप असतं, मग भारतीय शेतकऱ्यांच्या जीवाचं काहीही मोल नाही का?' असं विचारत  गौहर खानने (Gauhar Khan) #BlackLivesMatter ची आठवण करून दिली. आता तिचं ट्वीट वेगाने VIRAL होताना दिसत आहे.

'एखाद्या जीवाचं मोल खूप असतं, मग भारतीय शेतकऱ्यांच्या जीवाचं काहीही मोल नाही का?' असं विचारत गौहर खानने (Gauhar Khan) #BlackLivesMatter ची आठवण करून दिली. आता तिचं ट्वीट वेगाने VIRAL होताना दिसत आहे.

'एखाद्या जीवाचं मोल खूप असतं, मग भारतीय शेतकऱ्यांच्या जीवाचं काहीही मोल नाही का?' असं विचारत गौहर खानने (Gauhar Khan) #BlackLivesMatter ची आठवण करून दिली. आता तिचं ट्वीट वेगाने VIRAL होताना दिसत आहे.

मुंबई, 05 फेब्रुवारी: अमेरिकन पॉप स्टार (American Pop Star) रिहानाने (Rihanna) भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत (Farmer Protest) भाष्य केल्यानंतर सारं बॉलीवूड (Bollywood) ढवळून निघालं आहे. रिहानाच्या एका ट्वीटनंतर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी ट्वीट करत भारतविरोधी प्रोपगंडा (Propaganda) पासून सावध राहण्याचा इशारा केला आहे. आता बॉलीवूड अभिनेत्री गौहर खाननेही (Gauhar Khan) या मुद्यावर आपलं मत (Statement) व्यक्त केलं आहे. तिने शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त करताना बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. गौहर खानने #BlackLivesMatter चा मुद्दा उपस्थित करत बॉलिवूडकरांचे ट्वीट हे अपप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं आहे. तिचं हे ट्वीट आता वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

2020 साली अमेरिकेत एका अश्वेत व्यक्तीला जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा मुद्दा गौहर खानने उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेत खूप गोंधळ आणि हिंसाचार घडला होता. यावेळी तिने #BlackLivesMatter चा मुद्दा उपस्थित करत एक प्रश्न विचारला आहे. तिने म्हटलं की, #BlackLivesMatter हा भारताचा अंतर्गत विषय नव्हता. तरीही भारतातील अनेक सेलिब्रिटीजने या प्रकरणांत ट्वीट करत आवाज उठवला होता. तिने यावेळी म्हटलं की, 'एखाद्या जीवाचं मोल खूप असतं, मग भारतीय शेतकऱ्यांच्या जीवाचं काहीही मोल नाही का?'

या प्रकरणामुळे गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्येही खूप गदारोळ झाला होता. ज्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये लपून बसावं लागलं होतं. या मुद्यावर करीना कपूर, दीपिका पादुकोण, करण जौहर, प्रियांका चोप्रासहीत अनेक बॉलीवूड कलाकारांनी ट्वीट करत आवाज उठवला होता. गौहरच्या या ट्वीटवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत रिहानाने ट्वीट केलं होतं. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक आवेदन जारी केलं आहे. त्यानंतर बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार, अजय देवगण, कंगना राणौत, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकरसहीत अनेक क्रिकेट खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यांनी देशातील एकता कायम ठेवण्यासाठी भारताविरोधी एजेंडा चालवणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News