मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वत:चे पैसे खर्च करण्यापूर्वी पत्नीला विचारावं लागतं, Shahid Kapoor ने स्वत: केला खुलासा

स्वत:चे पैसे खर्च करण्यापूर्वी पत्नीला विचारावं लागतं, Shahid Kapoor ने स्वत: केला खुलासा

'पूर्वी मी खूप पैसे खर्च करायचो. अनेकदा माझ्याकडचे सर्व पैसे संपून जायचे. परंतु, आता मी फॅमिली मॅन आहे. त्यामुळे खर्च करण्यापूर्वी खूप विचार करतो, तसंच पत्नी मीराचा देखील सल्ला घेतो', असं वक्तव्य 'जर्सी' स्टार शाहिदने केलं आहे

मुंबई, 26 एप्रिल: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Bollywood Actor Shahid Kapoor) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जर्सी (Jersey) या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जर्सी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. मात्र, केजीएफ 2 (KGF 2) मुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नक्कीच परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. शाहिद कपूरचा जर्सी 22 एप्रिल 22 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहिदसोबत मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) प्रमुख भूमिकेत आहे. शाहिदचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर (Pankaj Kapoor) हे देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सध्या शाहिद त्याच्या एका खुलाश्यामुळे जोरदार चर्चेत आहे. 'पूर्वी मी खूप पैसे खर्च करायचो. अनेकदा माझ्याकडचे सर्व पैसे संपून जायचे. परंतु, आता मी फॅमिली मॅन आहे. त्यामुळे खर्च करण्यापूर्वी खूप विचार करतो, तसंच पत्नी मीराचा देखील सल्ला घेतो', असं त्यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

हे वाचा-LOCK UPP नंतर मुनव्वर फारुखीला मोठ्या शोची ऑफर, टीव्हीवर झळकणार स्टॅन्डअप कॉमेडियन

शाहिदने नुकत्याच त्याच्या लग्नानंतरच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 'लग्न झाल्यापासून पैसे खर्च करण्याच्या माझ्या सवयी बदलल्या आहेत', असं शाहिद सांगतो. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणतो, 'माझं कुटुंब आहे. पत्नी, मुलं आहेत. त्यामुळे मी विचारपूर्वक आणि बुद्धिचा वापर करून काम करू लागलो आहे. मी आता पूर्ण विचार करून पैसे खर्च करतो. तसेच कोणत्याही गोष्टीसाठी पैसे खर्च करण्यापूर्वी मी पत्नी मीरालादेखील विचारतो.'

'यापूर्वी मी ऑल आउट होत असे. परंतु, आता तसं होत नाही. मी आता फॅमिली मॅन (Family Man) आहे. मला पत्नी आणि मुलं आहेत. त्यामुळे मला खर्च करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते. विचार करावा लागतो. मी ट्रिपला जाण्याकरिता परवानगी घेतली नव्हती. मला वाटतं तो माझा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला कधीतरी सहलीला जाण्याचा अधिकार असतो,' असं शाहिदनं स्पष्ट केलं.

हे वाचा-राम चरणने शेअर केले 'आचार्य'च्या सेटवरील जबरदस्त फोटो, क्षणार्धात झाले VIRAL

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Mira Rajput) 2015 मध्ये विवाहबद्ध झाले होते. या दाम्पत्याला जैन कपूर आणि मीशा कपूर अशी दोन मुलं आहेत. शाहिद नेहमीच त्याच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतो. केवळ शाहिदच नाही तर त्याची पत्नी मीरा ही देखील सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि फॅन्ससोबत कनेक्ट राहते. भलेही मीरानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसलं तरी सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. तिच्या पोस्ट देखील नेहमीच चर्चेत असतात.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Shahid kapoor, Shahid Kapoor-Mira Rajput