Home /News /entertainment /

LOCK UPP नंतर मुनव्वर फारुखीला मोठ्या शोची ऑफर, टीव्हीवर झळकणार स्टॅन्डअप कॉमेडियन

LOCK UPP नंतर मुनव्वर फारुखीला मोठ्या शोची ऑफर, टीव्हीवर झळकणार स्टॅन्डअप कॉमेडियन

सध्या एकता कपूरचा (Ekta Kapoor) 'लॉक अप' (Lock Upp) प्रचंड चर्चेत आहे. सतत वादविवाद, भांडणे, राडे पाहायला मिळतात. तसेच शोमध्ये अनेक शॉकिंग खुलासे होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढते. या शोमुळे स्पर्धकांनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 एप्रिल- सध्या एकता कपूरचा  (Ekta Kapoor) 'लॉक अप'   (Lock Upp)  प्रचंड चर्चेत आहे. सतत वादविवाद, भांडणे, राडे पाहायला मिळतात. तसेच शोमध्ये अनेक शॉकिंग खुलासे होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढते. या शोमुळे स्पर्धकांनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. दरम्यान स्टँडअप कॉमेडियन आणि कंगना राणौतच्या रिअॅलिटी शो 'लॉक अप'चा स्पर्धक मुनव्वर फारुकी  (Munawar Faruqui) आणि अभिनेत्री महिका शर्मा  (Mahika Sharma)  यांना 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी'ची    (Fear Factor: Khatron Ke Khiladi)  ऑफर मिळाली आहे. सध्या मुनव्वरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.शोच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, निर्माते या 12 व्या सीजनला अधिक रंजक बनविण्यासाठी आणि या रिअॅलिटी टीव्ही शोला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. मागील सीजनच्या तुलनेत शोचे बजेट वाढविण्यात आले आहे. सूत्रांनी पुढे सांगितलं की, 'माहिका शोमध्ये खूप सक्रिय आहे. तिच्या वादविवादांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महिकालाही या शोसाठी अप्रोच करण्यात आलं आहे. माहिकाने अफगाणिस्तान प्रकरणावर भाष्य केलं होतं.आणि म्हटलं होतं की, ती खूप नाराज आहे. ती अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी सैनिकांना राखी बांधून त्यांना योग्य तो धडा देईल. यामुळे तिलासुद्धा 'खतरों के खिलाडी 12'ची ऑफर आली. बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने होस्ट केलेला रिअॅलिटी टीव्ही शो 'खतरों के खिलाडी' मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सुरू होणार आहे. प्रतीक सहजपाल, उमर रियाझ, शिवांगी जोशी, एरिका फर्नांडिस आणि कोरिओग्राफर तुषार कालिया या इतर स्टार्सनाही या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे. बिग बॉस तक मधील रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 15 फेम प्रतीक सहजपाल, निशांत भट आणि राजीव आदितिया या शोसाठी 'जवळपास कन्फर्म' झाले आहेत. 'बिग बॉस 13' फेम टीव्ही अभिनेत्री आरती सिंह देखील 'KKK' 12 साठी चर्चेत आहे. तुषार कालिया, पवित्रा पुनिया, उर्वशी ढोलकिया आणि एरिका फर्नांडिस हे इतर सेलिब्रिटीज ज्यांची नावे 'जवळजवळ निश्चित' स्पर्धक म्हणून समोर आली आहेत. रिपोर्टनुसार, 'ये रिश्ता क्या केहेलात है', आणि 'बालिका वधू 2' फेम शिवांगी जोशी देखील या शोसाठी चर्चेत आहे. मात्र, यापैकी कोणत्याही नावाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.त्यामुळे चाहत्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ekta kapoor, Entertainment, Rohit Shetty, Tv shows

    पुढील बातम्या